पंकजा मुंडे
सुरेश धस
मनोज जरांगे
--
बीड जिल्ह्यात आज तीन दसरा मेळावे
---
भगवान भक्तिगड, नारायण गड, मच्छिंद्रनाथ गडावर जय्यत तयारी
--
बीड, ता.१९ : जिल्ह्यात यंदा एकाच दिवशी, मंगळवारी (ता. २०) तीन दसरा मेळावे होत असून, जय्यत तयारी सुरू आहे. भगवान भक्तिगड, नारायणगड आणि मच्छिंद्रनाथ गडावर होणाऱ्या या मेळाव्यांकडे राज्याचे लक्ष असेल.
सावरगावघाट (ता. पाटोदा) येथील श्रीक्षेत्र भगवान भक्तिगडावर दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या मेळाव्यासाठी राज्यातून मोठ्या संख्येने भाविक आणि समर्थक उपस्थित राहणार आहेत. ११० एकरवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासन, पोलिसांकडून सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे. भक्तगण व ग्रामस्थांतर्फे दोन लाख पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे मोफत वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. मैदानाचे सपाटीकरण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्थेवर भर देण्यात आला आहे.
जरांगे नारायण गडावर
--
नारायण गडावर (ता. शिरूर कासार) मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा होणार आहे. ते काय भूमिका मांडतात, याकडे राज्याचे लक्ष असेल. येथील मेळाव्याची तयारीही अंतिम टप्प्यात आहे.
मच्छिंद्रनाथ गडावर तयारी
--
आष्टी मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी यंदा वेगळी चूल मांडली असून, ते श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर (मायंबा, ता. पाटोदा) येथे यंदा दसरा मेळावा घेत आहेत. नाथ संप्रदायाची समृद्ध परंपरा पुढे नेण्याच्या उद्देशाने होणाऱ्या या मेळाव्यासाठी गडावर जय्यत तयारी सुरू आहे. मंगळवारी (ता.२०) सकाळी साडेदहा ते दुपारी पावणेदोन या वेळेत संत, महंत आणि विश्वस्तांच्या उपस्थितीत हा मेळावा होत आहे.
चौकट
धनंजय मुंडे असणार दोन्ही गडांवर
--
आमदार धनंजय मुंडे हे मात्र दोन्ही गडांवर हजेरी लावणार आहेत. ‘विचारांचे सोने लुटण्यासाठी मी येतोय, तुम्हीही या’, असे आवाहन त्यांनी केले असून, दसऱ्याच्या दिवशी सकाळी ते भगवान गडावर जाऊन संत भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेतील व महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांची भेट घेतील. दुपारी ते सावरगाव येथे खासदार पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
मोठ्या गर्दीची शक्यता
--
बीड जिल्ह्यात एकाच दिवशी तीन मेळावे होणार असल्याने राज्यभरातील भाविक, समर्थक दाखल होणार आहेत. प्रत्येक ठिकाणी मोठ्या संख्येने लोक मेळाव्यांत असतील. गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही बंदोबस्ताची तयारी केली आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.