छत्रपती संभाजीनगर

भाजीमंडईत आवक घटली, किरकोळ बाजार तेजीत

CD
भाजीमंडईत आवक घटली, किरकोळ बाजार तेजीत -------- शहरात टोमॅटो, बटाटे, कांद्यापासून पालेभाज्यांपर्यंत काही अंशी भाववाढ ------------- छत्रपती संभाजीनगर, ता. २५ : पाण्याअभावी भाजीपाल्याचे उत्पादन घटल्याने जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीमंडईत आवक कमी झाली आहे. परिणामी, शहरातील किरकोळ बाजारात भाजीपाल्याच्या भावात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. शहरातील किरकोळ भाजीपाला बाजारात रविवारी (ता. २५) लसूण प्रतिकिलो ४०० रुपये, अद्रक २४० रुपये, तर लिंबाचे भाव २०० रुपयांपर्यंत नोंदले गेले. नियमित वापरातील बटाटा, कांदा, टोमॅटो, भेंडी, गाजर यांसह बहुतांश भाज्यांच्या भावातही काहीशी वाढ झाली. बाजारात बटाट्याचे दर प्रतिकिलो ३० रुपये, कांदा ६० रुपये, भोपळा आणि काकडी ५० वरून ६० रुपये, तर टोमॅटो ५० रुपये आहे. वांगी आणि गाजराचे भाव ८० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोचले आहेत. भेंडी ६० वरून ८० रुपये, कारले ८० रुपये, कोबी ५० वरून ६० रुपये, तर फ्लॉवर आणि वालाचे भाव प्रतिकिलो ८० रुपये आहेत. गिलके, हिरवी मिरची आणि सिमला मिरचीसाठीही प्रतिकिलो ८० रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत. ---- लसूण, अद्रक २४० रुपयांवर भाजीला फोडणी देण्यासाठी लागणाऱ्या पदार्थांचेही भाव वाढले आहेत. लसूण २५० ते ४०० रुपये, अद्रक २४० रुपये, तर लिंबाचे भाव प्रतिकिलो २०० रुपयांपर्यंत पोचले आहेत. शेवगा १०० वरून १२० रुपये, तर दिलपसंद ८० वरून १०० रुपये प्रतिकिलोवर पोचला आहे. कंटुले २०० रुपये, तर श्रावण घेवडा १२० रुपये प्रतिकिलोने मिळत आहे. ---- मेथीची जुडी २५, तर कोथिंबीर २० रुपयांना पालेभाज्यांमध्ये मेथीची जुडी २५ रुपये, कोथिंबिरीची जुडी २० रुपये, तर चुका, शेपू, पालक, करडी आणि तांदुळजा १५ रुपयांना मिळत आहे. ---- भाजीपाल्याचे आजचे भाव (प्रतिकिलो, रु.) बटाटे - ३० कांदा - ६० भोपळा - ६० काकडी - ६० टोमॅटो - ५० वांगे - ८० भेंडी - ८० गाजर - ८० कारले - ८० कोबी - ६० फ्लॉवर - ८० वाल - ८० गिलके - ८० हिरवी मिरची - ८० सिमला मिरची - ८० दिलपसंद - १०० लिंबू - २०० दोडके - ८० शेवगा - १२० अद्रक - २४० लसूण - २५० ते ४०० श्रावण घेवडा (बिन्स) - १२० कंटुले - २००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : मल्लिकार्जुन खरगेंचं वादग्रस्त वक्तव्य; PM मोदींबद्दल बोलताच कार्यक्रमात गोंधळ, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून एकाला मारहाण, नेमकं काय घडलं?

Madhuri Dixit Kon Honaar Karodpati : "बाई, तुम्ही खूप कडक बोलताय..."; शिक्षिकेसमोर थेट विद्यार्थी बनली माधुरी दीक्षित! 'कोण होणार करोडपती'मधील सुंदर क्षणाचा व्हिडिओ व्हायरल!

Latest Marathi News Update : नवी मुंबईत आकाराला येणार अत्याधुनिक दागिने उत्पादन केंद्र; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 'इंडिया ज्वेलरी पार्क'चा शुभारंभ!

Manoj Jarange: ‘कितीही प्रयत्न झाले तरी सत्य बाहेर आणणारच’; ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक

''वृक्षतोडीबाबत ‘फेक नॅरेटिव्ह’ पसवण्याचा प्रयत्न'', CM फडणवीसांनी सांगितलं कर्जतमधील टोरेंट प्रकल्पाचं महत्त्वं, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT