छत्रपती संभाजीनगर

साहित्यातून माणसाला नवी दृष्टी मिळते प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार; ‘भावनांची गुंफण’ आणि ‘अनोखी वीण’ पुस्तकांचे प्रकाशन

CD
लातूर : मराठवाडा साहित्य परिषदेच्या लातूर शाखेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सुनीता संजय मोरे लिखित ''भावनांची गुंफण’ व ‘अनोखी वीण’ या पुस्तकांचे प्रकाशन करताना डॉ. नागोराव कुंभार. --- ‘भावनांची गुंफण’, ‘अनोखी वीण’चे प्रकाशन लातूर, ता. १५ : मराठवाडा साहित्य परिषदेच्या लातूर शाखेच्या वतीने कवयित्री सुनीता संजय मोरे लिखित ‘भावनांची गुंफण’ या कवितासंग्रहाचा आणि ‘अनोखी वीण’ या कथासंग्रहाचे प्रकाशन प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांच्या हस्ते झाले. यावेळी मराठवाडा साहित्य परिषदेचे सदस्य डॉ. जयद्रथ जाधव, कवी योगिराज माने, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट सदस्या प्राचार्य डॉ. कुसुम मोरे, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. गोविंद घार आदी उपस्थित होते. डॉ.कुंभार म्हणाले, की साहित्य माणसाला केवळ मनोरंजन देत नाही, तर जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी आणि मूल्यदृष्टीही प्रदान करते, ‘भावनांची गुंफण’ या कवितासंग्रहातून मानवी मनातील विविध भावभावना, संवेदना आणि जीवनानुभवांना काव्यरूप मिळाले आहे. तर ‘अनोखी वीण’ या कथासंग्रहातून मानवी नातेसंबंध, सामाजिक वास्तव आणि जीवनातील विविध पैलू कथांच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या दोन्ही साहित्यकृतींमधून लेखिकेची कौटुंबिक, सामाजिक, मानवांप्रती असलेली संवेदनशीलता, निरीक्षणशक्ती आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन व्यक्त होतो, असे नमूद केले. प्रस्ताविक शैलजा कारंडे तर सूत्रसंचालन दयानंद बिराजदार यांनी केले. डॉ. संजय मोरे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Akole Protest : लाडक्या बहिणी रस्त्यावर! KYC च्या नावाखाली अनुदान बंद केल्याचा आरोप करत वर्षा बंगल्यावर धडक देण्याचा इशारा, सरकारला अल्टिमेटम

Yogi Adityanath: मुलींचा शाळा सोडण्याचा दर २० टक्क्यांवरून ३ टक्क्यांखाली? योगी सरकारचा शिक्षणातील बदलाचा दावा

Amravati Teacher Constituency Election: बच्चू कडूंचं मतांच्या गणितावर भाष्य

Latest Marathi News Update : संजय राऊत मातोश्री ऐवजी थेट शिवतीर्थावर, राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस, तर राहुल गांधींनाही फटकारलं; SIR प्रकरणी याचिकेवर सुनावणी

SCROLL FOR NEXT