छत्रपती संभाजीनगर

पुष्पगुच्छ ऐवजी द्या पुस्तके!

CD
(फोटो ः ABD26J81615 ----- छत्रपती संभाजीनगर ः पुस्तके दान देताना अमोल येडगे. ------------ पुष्पगुच्छ नको, पुस्तके द्या! ---- महापालिकेच्या उपक्रमाला प्रतिसाद ः आयुक्तांनी दान केली ६१ पुस्तके ------------ सकाळ वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर, ता. १८ ः बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानाअंतर्गत महापालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘पुस्तक दान’ उपक्रमाला नागरिकांसह अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आयुक्त अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी वाचनालये उभारली जाणार असून, या उपक्रमात जमा होणारी सर्व पुस्तके शालेय विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. उपक्रमाची सुरवात करत महापालिका मुख्यालयात आयुक्त अमोल येडगे यांनी मराठी भाषेची ४० आणि इंग्रजी भाषेची २१ अशी ६१ पुस्तके दान केली. शिक्षण विभागाकडून प्राप्त होणाऱ्या पुस्तकांचे मराठी, इंग्रजी आणि उर्दू अशा तीन भाषांमध्ये वर्गीकरण केले जात आहे. यावेळी आयुक्तांनी सांगितले की, महापालिकेच्या कोणत्याही कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत करताना पुष्पगुच्छ ऐवजी विविध विषयांवरील पुस्तके भेट द्यावीत. ही पुस्तके शाळांच्या वाचनालयात जमा होऊन विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास मदत होईल. यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, मुख्य लेखापरीक्षक शिवाजी नाईकवाडे, उपआयुक्त अपर्णा थेटे, अंकुश पांढरे, सविता सोनवणे, अभय प्रामाणिक, सहायक आयुक्त लता पुजारी, कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे, जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद, अधीक्षक दीपक जावळे, रवींद्र खरात, अतुल बनकर, करण साळवे उपस्थित होते. -------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Election 2026 : गोकुळच्या मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा; मतपत्रीकेचे फोटो व्हायरल, नजर चुकवून मोबाईलवर काढले फोटो

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत शेतकरी आत्महत्यांचे सत्र; २५ दिवसांत १४ जणांनी संपवले जीवन, दुष्काळामुळे चिंता वाढली

आम्ही घाबरणार नाही, माघारही घेणार नाही! अभिजित दिपकेंनी सांगितला पुढचा प्लॅन, नेमकं काय म्हणाले?

Satara Farmer Loan Waiver: साताऱ्यात ७,७८९ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित; कर्जमाफी होऊनही पात्रतेचा खोडा, धक्कादायक कराण आल समाेर!

सासऱ्यांनी सांगितलं एका वर्षाचा आत वजन घटव... कविता मेढेकर यांचा खुलासा, म्हणाल्या, 'माझे सासू-सासरे...'

SCROLL FOR NEXT