sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar : शहरावर आता ड्रोनची नजर

शहरातील सर्व पोलिस ठाणे या कॅमेऱ्यांसोबत जोडले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - स्मार्ट सिटीच्या एकात्मिक सुरक्षा आणि सिटी ऑपरेशन्स प्लॅटफॉर्म प्रकल्पाअंतर्गत पाच ड्रोन खरेदी करण्यात आले आहेत. यातील तीन ड्रोन महापालिकेचे प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांनी पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांना सुपूर्द केले. सणासुदीच्या काळात, मोर्चा, आंदोलने हाताळताना पोलिस या ड्रोनचा वापर करणार आहेत.

स्मार्ट सिटी अभिनाअंतर्गत शहरात ७०० सीसीटीव्ही बसविण्यात आले असून, शहरातील सर्व पोलिस ठाणे या कॅमेऱ्यांसोबत जोडले आहेत. पोलिस आयुक्तालयात कंट्रोल ॲण्ड कमांड रूम आहे. एकात्मिक सुरक्षा व सिटी ऑपरेशन्स प्लॅटफॉर्म प्रकल्प राबविण्यात आला. त्यात पाच ड्रोन खरेदी करण्यात आले. त्यातील तीन ड्रोन पोलिसांना गुरुवारी (ता. २१) सुपूर्द करण्यात आले.

सिटी चौक, जिन्सी, क्रांती चौक या तीन पोलिस ठाण्यांना ड्रोन देण्यात आले. त्यानुसार पोलिस कर्मचाऱ्यांसाठी ड्रोन उड्डाण प्रशिक्षण आयोजित केले आहे. दरम्यान, या ड्रोनची त्यांच्या बेस स्टेशनपासून दोन किलोमीटरची प्रभावी ऑपरेशनल रेंज आहे आणि प्रत्येक फ्लाइटमध्ये अंदाजे ३० मिनिटे हवेत राहू शकतात. या ड्रोनचे वैशिष्ट्य म्हणजे रीअलटाइम लाइव्ह व्हिडिओ करण्याची त्यांची क्षमता आहे.

या कार्यक्रमाला पोलिस उपायुक्त अपर्णा गिते, सहाय्यक पोलिस आयुक्त धनंजय पाटील, पोलिस निरिक्षक प्रविणा यादव, निर्मला परदेशी, रमेश्वर रेंगे, संतोष पाटील, स्मार्ट सिटीचे प्रकल्प व्यवस्थापक फैज अली यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT