Crime  Sakal
छत्रपती संभाजीनगर

Crime : नोट्स देतो सांगत शिकवणीतील शिक्षकाचे विद्यार्थिनीशी बंद खोलीत अश्लील चाळे; थेट कारागृहात रवानगी

शांत बस नाहीतर तुला मारून टाकेन अशी धमकी शिक्षकाने विद्यार्थिनीला दिली.

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : खासगी शिकवणीचा क्लास संपल्यानंतर घरी निघालेल्या १५ वर्षीय विद्यार्थिनीला नोट्स देतो म्हणत शिक्षकाने वर्गात नेले. त्यानंतर दरवाजा बंद करून तिच्याशी अश्लील चाळे करत विनयभंग केला. विशेष म्हणजे तिने ‘सर असं काय करताय, असं करू नका’ अशी विनवणी केल्यानंतरही त्याने ‘शांत बस नाहीतर तुला मारून टाकीन’ असे धमकावले. याप्रकरणी ‘त्या’ शिक्षकाविरोधात पुंडलिकनगर पोलिसांत गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. राजेश कैलास शिंगारे (रा. गजानननगर, गल्ली क्र. ७) असे शिक्षकाचे नाव आहे.

याप्रकरणी विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार ती दहावीत शिकते. १९ सप्टेंबर रोजी ती सकाळी साडेनऊदरम्यान इतर दोन मैत्रिणींसोबत गजानननगरातील गल्ली क्र. एकमध्ये असलेल्या एक्सलन्स ॲकॅडमी (ॲबॅकस क्लास) येथे शिकवणीसाठी गेली होती. सुरवातीला एका महिला शिक्षिकेचा वर्ग झाल्यानंतर विज्ञान विषय शिकवणारा शिक्षक राजेश शिंगारे याला पीडितेने विज्ञानच्या नोट्स मागितल्या असता, चल तुला नोट्स देतो म्हणत शिक्षकाने तिला वर्गात नेले.

विद्यार्थिनी करत होती विनवणी

विद्यार्थिनीला वर्गात नेताच शिक्षक राजेशने दरवाजा बंद केला. त्यावर तिने दरवाजा बंद का केला असे विचारताच शिक्षकाने शांत बस नाहीतर तुला मारून टाकीन असे म्हणताच ती शांत बसली. मात्र, त्याने तिला जवळ ओढत तिच्याशी अश्लील चाळे केले. त्यावर विद्यार्थिनीने विनंती केली असता, शिक्षकाने तिला ठार मारण्याची धमकी देत अश्लील चाळे करण्याचा प्रकार चालूच ठेवला. विद्यार्थिनीने त्याला ढकलून स्वतःची सुटका करून घेत पळ काढला आणि थेट मैत्रिणीला सांगितले.

दरम्यान, तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला तत्काळ बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्याची तुरूंगात रवानगी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Dahihandi: ९व्या थरावरून गोविंदा कोसळला, मनसेच्या गणेश चुक्कल दहीहंडीत थरारक प्रकार

नॅशनल हायवेवर थांबलेल्या ट्रकला कार धडकून८ इंजिनिअर विद्यार्थ्यांचा मृत्यू; घटनेचा CCTV VIDEO VIRAL

Solapur Ganesh Mandal Electricity : मंडळांना अर्जानंतर २४ तासांत वीज महावितरणकडून ऑनलाइन अर्जाची सुविधा; मिरवणूक मार्गावरही कर्मचारी तैनात

Marathi News Live Updates: अलंकार महिला पीजी कॉलेजमध्ये NEET PG 2026ची पुनर्परीक्षा सुरू, परीक्षा केंद्रांवर कडेकोट सुरक्षा

Nandurbar MBBS Student : नंदुरबारात 'एमबीबीएस'च्या २१ वर्षीय विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT