covid 19 vaccination covid 19 vaccination
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत नऊशे रुपयांत खासगी रुग्णालयात मिळतेय लस

शहरात एक मेपासून राज्य शासनातर्फे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले होते

माधव इतबारे

औरंगाबाद: लसींचा तुटवडा असल्याने शासनाने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद केले आहे. ॲपवर नोंदणी देखील होत नाही. असे असताना शहरातील एका खासगी रुग्णालयात १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण सुरू आहे. एका डोससाठी नऊशे रुपये शुल्क आकारले जात आहे. या ठिकाणी लसीकरणाला परवानगी कशी मिळाली? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

शहरात एक मेपासून राज्य शासनातर्फे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले होते. पण लसीकरण केंद्रावर एकच गोंधळ उडाल्याने १० मेपासून १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण थांबविण्याचे आदेश दिले. सध्या फक्त ४५ वर्षांवरील व्यक्तींचेच लसीकरण सुरू आहे. असे असताना सोमवारपासून शहरातील एका खासगी हॉस्पिटलच्या केंद्रावर अचानकपणे १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण सुरू झाले आहे. त्यासाठी तब्बल नऊशे रुपये शुल्क आकारले जात आहे.

याविषयी महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले की, या हॉस्पिटलने थेट कंपनीकडून लस खरेदी केली आहे. त्यानुसार ते लसीकरण करत आहेत. त्यांच्यासाठीही कोवीन ॲपवरुन नोंदणी करून लस द्यावी असे आदेश आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT