Aurangabad Aurangabad
छत्रपती संभाजीनगर

Success Story: कॉर्पोरेट नोकरी सोडून तरूण वळाला देशी गोवंश संवर्धनाकडे

जवळपास एका दिवसाला ३६० लिटर दूध ते काढत असून दुधावर कुठलीच रासायनिक प्रक्रिया न करता बंद काचेच्या बाटलीत घरोघरी ‘अनुसरा देशी गाई दूध’ अशा माध्यमातून ते व्यवसाय करत आहेत

सुनिल इंगळे

जवळपास एका दिवसाला ३६० लिटर दूध ते काढत असून दुधावर कुठलीच रासायनिक प्रक्रिया न करता बंद काचेच्या बाटलीत घरोघरी ‘अनुसरा देशी गाई दूध’ अशा माध्यमातून ते व्यवसाय करत आहेत

औरंगाबाद: उच्चशिक्षित असलेल्या तरुणाने एका कॉर्पोरेट कंपनीतील उच्चपदाची असलेली नोकरी सोडत देशी गोवंश संवर्धनाचा वसा घेतला आणि या व्यवसायातून ते वर्षाकाठी पाच लाखांचे उत्पन्न मिळवत आहेत. औरंगाबाद येथील राम राठोड हे चांगली नोकरी सोडून देशी गोवंश संवर्धनाचे काम करत आहेत. या देशी गाईच्या दुधातून पनीर, तूप यांची विक्री करत आहेत. जवळपास एका दिवसाला ३६० लिटर दूध ते काढत असून दुधावर कुठलीच रासायनिक प्रक्रिया न करता बंद काचेच्या बाटलीत घरोघरी ‘अनुसरा देशी गाई दूध’ अशा माध्यमातून ते व्यवसाय करत आहेत.

कोरोनामुळे विविध क्षेत्रात बंधन आले. यात काहींची नोकरी गेली; परंतु अशा परिस्थितीत उच्चपदाची नोकरी सोडत राठोड यांनी वडिलोपार्जित असलेला डेअरी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. मे २०२१ ला अनुसरा देशी गाई दूध फार्मची सुरुवात केली. यातून त्यांनी जवळपास दहा लाखांची गुंतवणूक केली. यातून केवळ सहा महिन्यांतच त्यांना चांगले उत्पन्न मिळायला सुरुवात झाली. या जवळपास त्यांच्याकडे बारा देशी गाई असून दिवसाला ३६० लिटर दुधाचे उत्पादन मिळते. या दुधातून तूप, पनीर याचे उत्पादन घेत ते बाजारात विक्री करत यातून दिवसाला पंचवीस ते तीस हजार रुपयांचे उत्पन्न घेत आहेत.

जर्सीपेक्षा देशी गाय उत्तम-
शहराला येणारे दूध ९९ टक्के जर्सी गाईचे दूध मिळते; परंतु या अनुसरा देशी गाई दूध फार्ममधून केवळ देशी गायीचे दूध देण्यात येते, हे दूध शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असून सुरक्षित असल्याचे राठोड सांगतात. तर दूध शेतकरी वर्गाकडून घेऊन त्यावर रासायनिक प्रक्रिया न करता ते दूध थेट ग्राहकांना दिल्यामुळे त्या दुधाची गुणवत्ता चांगली असते असे राठोड म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT