अनधिकृत नळजोडणीवर आता कारवाई
-----
उपायुक्त डॉ. खानसोळे यांची माहिती, तोटी नसलेल्या नळावरही लक्ष
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. २२ ः शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील उपयुक्त पाणीसाठा ९ टक्क्यांवर आल्याने भविष्यात शहराला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आता महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीने विविध उपाय योजना केल्या जात आहेत. त्यात आता अनधिकृत नळजोडणीवर शुक्रवारपासून (ता. २३) कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन आयुक्त राहुल कुलकर्णी व उपायुक्त खानसोळे यांनी गेल्या काही दिवसांपासून उपाय योजनांवर भर दिला आहे. याता प्रामुख्याने मांजरा धरणातून शहराकडे येणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत उपसा करणाऱ्या नळाच्या अनेक जोडणी काढून टाकल्या आहेत. परिणामी त्यांना शेतकऱ्यांचा विरोधही पत्करावा लागला आहे.
आता शहरातील पाण्याचा अपव्यय यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय केला तर थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पाणी अपव्ययाची पहिली चूक केली तर पाच हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. दुसरी चूक केल्यास दहा हजार रुपये दंड केला जाणार आहे. तिसरी चूक केल्यास मात्र २५ हजार रुपये दंड व फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिकेने यापूर्वीच दिला आहे.
शहरात अनधिकृत नळजोडण्याचा विषय मोठा आहे. शहरात गावभागात तसेच नांदेड रस्त्याचा परिसरात हजारो नळ जोडण्या अनधिकृत आहेत. महापालिकेच्यावतीने सर्वेक्षण सुरु आहे. आतापर्यंत काही भागाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. अशा ठिकाणी पाच टक्के नळजोडण्या अनधिकृत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अशा नळजोडण्याच्या ठिकाणी कारवाई करण्यात येणार आहे. यासोबतच अनेक नळांना तोट्या नाहीत. त्या ठिकाणी देखील कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती खानसोळे यांनी दिली.
रविवारी पुन्हा मोहीम
मांजरा धरणातून शहराकडे येणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरील अनेक अनधिकृत नळ जोडण्या तोडण्यात आल्या आहेत. तांदूळजा सारख्या ठिकाणी नागरिकांनी विरोध केल्याने पथकाला गेल्या आठवड्यात परत यावे लागले होते. आता रविवारी पुन्हा मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळ जोडण्या तोडण्यात येणार आहेत, अशी माहिती खानसोळे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.