crime news esakal
छत्रपती संभाजीनगर

Crime news : पाच जणांनी पळवला ‘तो’ हायवा;सीसीटीव्हीत झाले उघड

गौण खनिजाची अवैधरीत्या वाहतूक केल्या प्रकरणी जप्त करण्यात आलेला हायवा पाच जणांनी तहसील कार्यालयातून चोरला

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : गौण खनिजाची अवैधरीत्या वाहतूक केल्या प्रकरणी जप्त करण्यात आलेला हायवा पाच जणांनी तहसील कार्यालयातून चोरला असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी तपास, कारवाई करावी असे पत्र तहसीलदारांनी सीटीचौक पोलिस ठाण्यास पाठवले आहे.

तहसीलदार विजय चव्हाण यांनी सांगितले की, तहसील कार्यालयातून चोरी करण्यात आलेल्या हायवा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून १३ जून रोजी पाच ते सहा जणांनी हा हायवा पळवला असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे. प्रकरणात सहभागी असलेल्या लोकांची नावेही पोलिस ठाण्यास पाठवली आहेत.

या प्रकरणात या पाच लोकांशिवाय आणखी लोकांचा सहभाग असण्याची शक्यता असून, त्यामुळे संबंधितांच्या मोबाईल तपास केला तर सदर गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घेणे सोईस्कर ठरेल त्या अनुषंगाने तपास करण्यात यावा असे पत्र अपर तहसीलदार विजय चव्हाण यांनी सिटीचौक पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना पाठवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8व्या वेतन आयोगात ₹69,000 किमान वेतनासह जुनी पेन्शन योजनेचा प्रस्ताव

Petrol Diesel Rates update : पेट्रोल -डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका

खऱ्या आयुष्यातही सगळ्यांशी तुसडेपणाने वागतो समीर परांजपे; बायकोचा खुलासा, म्हणाली, 'आताची भूमिका सेम टू सेम'

Latest Marathi News Live Update: अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

SCROLL FOR NEXT