छत्रपती संभाजीनगर

फुलांची आवक वाढली

CD
फोटो क्रमांक OSM26B07243 धाराशिव ः झेंडूच्या फुलांची विक्री करताना शेतकरी. OSM26B07244 धाराशिव ः दसरा सणाच्या पूर्वसंध्येला सोमवारी शहरात झालेली झेंडूंच्या फुलांची आवक. ............ पिवळ्या, केशरी फुलांनी बहरली बाजारपेठ धाराशिव, ता. १९ (बातमीदार) : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठ झेंडूच्या पिवळ्या आणि केशरी फुलांनी बहरली आहे. देवी-देवतांच्या पूजनासह वाहने आणि शस्त्रांच्या पूजेसाठी झेंडूच्या फुलांना विशेष मागणी असते. ही बाब लक्षात घेऊन शहरातील ५० हून अधिक विक्रेत्यांनी सोमवारी (ता.१९) फुलांची विक्री सुरू केली. यंदा दर्जेदार आणि मोठ्या आकाराच्या फुलांना किलोमागे १०० रुपये, तर मध्यम व साधारण दर्जाच्या फुलांना ५० ते ८० रुपये भाव मिळत आहे. दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरासह तालुक्यातील शेतकरी झेंडूची लागवड करतात. मात्र, यंदा पावसाने ओढ दिल्याने अनेक भागांतील झेंडूच्या झाडांची आणि फुलांची अपेक्षित वाढ झाली नाही. सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी फुलशेती चांगल्याप्रकारे जोपासली. त्यामुळे त्यांच्या दर्जेदार फुलांना बाजारात चांगला भाव मिळत आहे. दुसरीकडे, पाणीटंचाईमुळे फुलांची वाढ खुंटल्याने काही शेतकऱ्यांना कमी दरात विक्री करावी लागत आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, राजमाता जिजाऊ चौक, नेहरू चौक, संत ज्ञानेश्वर मंदिर परिसर आणि मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीजवळ फुलांचे स्टॉल सजले आहेत. सणासाठी फुले खरेदी करण्यासाठी ग्राहकांचीही लगबग सुरू आहे. तुलनेने परवडणारे दर असल्याने विक्रेते आणि ग्राहक या दोघांनाही दिलासा मिळत आहे. .................... ((कोट)) अर्ध्या एकरात झेंडूची लागवड केली आहे. मात्र, पावसाअभावी फुले नेहमीप्रमाणे बहरली नाहीत. गेल्या वर्षी या क्षेत्रातील फुलांच्या विक्रीतून जवळपास पावणेदोन लाख रुपये मिळाले होते. यंदा पाणीटंचाईमुळे उत्पन्न कमी मिळण्याची शक्यता आहे. - गोकुळ देवकते, फुलउत्पादक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Result 2026 : एकटा बास! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ३ मंत्री, २ खासदार, १० आमदारांना पुरून उरले सतेज पाटील; वाचा विजयी उमेदवारांची फायनल यादी

Parenting style: पालकांनो सावधान! तुमच्या 'या' एका चुकीमुळे मूल जाऊ शकतं नैराश्यात; १५ वर्षांच्या अभ्यासातून खुलासा...

Latest Marathi News Live Update : प्यारे खान यांच्या भेटीनंतर गरबा मंडळाचं शुद्धीकरण

Sawai Gandharva Bhimsen Festival : यंदाचा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ १३ ते १७ जानेवारीमध्ये; प्रथमच फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजन

Gokul Election Satej Patil : गोकुळच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ; सतेज पाटील यांची तातडीने धाव अभिजित तायशेटे आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी

SCROLL FOR NEXT