लोहगाव (जि.औरंगाबाद) : आठवडे बाजारात लक्ष्मी, गौवळण व पणती खरेदी करताना ग्रामस्थ. (छायाचित्र : ज्ञानेश्वर बोरूडे) esakal
छत्रपती संभाजीनगर

Diwali : आर्थिक अडचणीमुळे शेतकऱ्यांकडून कमी खरेदी

आर्थिक अडचणीमुळे शेतकरी वर्गाने सण साजरा करण्यापुरतेच साहित्य खरेदी केल्याचे चित्र बघायला मिळाले.

ज्ञानेश्‍वर बोरुडे

लोहगाव (जि.औरंगाबाद) : दिवाळी सणाच्या (Diwali Festival 2021) पूर्वसंध्येला लोहगाव आठवडे बाजारावर अतिवृष्टीच्या पावसाचा परिणाम व कोरोनानंतर वाढलेल्या प्रचंड महागाईने जनता त्रस्त झाली आहे. आर्थिक अडचणीमुळे शेतकरी वर्गाने सण साजरा करण्यापुरतेच साहित्य खरेदी केल्याचे चित्र बघायला मिळाले. लोहगाव महसूल मंडळात सप्टेबर ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने खरीप हंगामातील कापूस बाजरी, तूर, सोयाबीन कांदा आदी पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या (Aurangabad) पदरात काहीच न आल्याने व कोरोनानंतर पेट्रोल, डिझेलपासुन ते जीवनावश्यक भाजीपाला, खाद्यतेल, किराणासह नियमित दैनंदिन गरजेचे सर्व साहित्याचे प्रचंड भाववाढ महागाईने शेतकरी, शेतमजूर, कुटुंबे हैराण झाले आहे. त्याचा परिणाम दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला मंगळवार (ता.दोन) आठवडे बाजारावर झाला.

या बाजारासाठी पहाटेपासूनच रेडिमेड कापड, किराणाभुसार, भाजीपाला, हलवाई, जनरल, लाह्या बताशे, पणती, गौवळण, लक्ष्मी, झाडू , फटाके विक्रेत्यांनी दुकान थाटल्या. परंतू नागरिकांचा खिशा रिकामा असल्याने सण साजरा करण्यासाठी लागणारे सामान खरेदीला उत्साह नव्हता. त्यामुळे जेमतेमच साहित्य खरेदीवर भर होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telegram: टेलिग्रामवर मोफत चित्रपट आणि वेब सिरीज पाहणाऱ्यांना धक्का! आता फुकट काही पाहता येणार नाही; केंद्र सरकारची मोठी कारवाई

IPL ची 'गुगली'! RCB चा पहिला सामना चिन्नास्वामीवर होईल, असे BCCI ने जाहीर केले खरे; पण, तिथे होईलच याची खात्री नाही

Tanaji Malusare : कोण आहेत नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज? आता कुठे असतात अन् कशी आहे परिस्थिती..पाहा शिवरायांच्या वीर मावळ्याची पिढी

IPL 2026 Schedule: मुंबई इ़ंडियन्ससाठी 'हे' वेळापत्रक लकी ठरणार! २०१९ नंतर जुळून आलाय योगायोग, सहावी ट्रॉफी आपलीच

Latest Marathi News Live Update : एकनाथ महाराज नाथषष्ठी सोहळ्याची सांगता

SCROLL FOR NEXT