Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची सभा होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त शहरात विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांतर्फे रविवारी (ता. १४) भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. रिपाइं (आठवले गट) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तर्फे सायंकाळी सहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची सभा होणार आहे.

आंबेडकरवादी संघर्ष समिती

आंबेडकरवादी संघर्ष समितीतर्फे विद्यापीठ गेट समोरील शहीद स्मारकाला अभिवादन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष श्रावणदादा गायकवाड यांनी केले.

भारतीय दलित पँथर

भारतीय दलित पँथरतर्फे नामांतर शहीद स्तंभाला अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता विद्यापीठ गेटजवळ हा कार्यक्रम होणार आहे. पँथर नेते ॲड. रमेशभाई खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती राहील. त्याचप्रमाणे प्रा. समाधान धांडे, रतनभाई खंडागळे, सुरेश खाडवे, गणेश चव्हाण, नीतेश तांगडे, कडुबा म्हस्के, किरण आरके आदी उपस्थित राहणार आहे.

धम्मरत्न मित्रमंडळ

राजमुद्रा चौक, टीव्ही सेंटर हडको येथे नामांतरातील शहीदांना अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी नऊ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

कीर्ती गृहनिर्माण संस्था

कीर्ती गृहनिर्माण संस्था, आझाद चौक सिडको एन-८ येथील लुंबिनी बुद्धविहारात सकाळी १०.३० वाजता अभिवादन कार्यक्रम घेणार आहे.

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडीतर्फे सकाळी ११.३० वाजता शहीद स्मारक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे. उपस्थितीचे आवाहन रूपचंद गाडेकर यांनी केले.

भारतीय दलित कोब्रा

भारतीय दलित कोब्रा संघटनेतर्फे सकाळी अभिवादन रॅली व अन्नदान असे कार्यक्रम होतील. त्यानंतर सायंकाळी पीईएस महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी ६.३० संघटनेचे प्रमुख विवेक चव्हाण यांची जाहीर सभा होणार आहे. यावेळी मराठवाडा अध्यक्ष अशोक दादा बोर्डे यांची प्रमुख उपस्थिती राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT