(((संपूर्ण मराठवाडा आवृत्तीसाठी SIILC च्या लोगोसह वापरावी)))
---
जाणून घ्या शेवगा लागवड,
निर्जलीकरण, निर्यात तंत्र
---
येत्या शनिवारी संभाजीनगर येथे कार्यशाळा
---
छत्रपती संभाजीनगर, ता. १७ : निर्यातक्षम शेवग्याची शेती, उत्पादन पद्धती, आधुनिक जाती, खत आणि पाणी व्यवस्थापन, छाटणी, फुलोरा अवस्था, काढणी व्यवस्थापन, डिहायड्रेशन तंत्राने मोरिंगा पावडर प्रक्रिया, निर्यात निकष, ट्रेसिबिलिटी, गुणवत्ता पडताळणी, परकीय बाजारपेठ, निर्यातीत शेंगांचा देठ किती व कसा ठेवावा, रसायन मुक्त उत्पादन, कागदपत्रांची पूर्तता, देशनिहाय निर्यातीचे नियमांसंदर्भात मार्गदर्शन करणारी एकदिवसीय कार्यशाळा २५ ऑक्टोबरला ‘सकाळ’ आणि ‘ॲग्रोवन’ संलग्न कौशल्य प्रशिक्षण संस्था एसआयआयएलसीतर्फे येथील सिडको बसस्थानक परिसरातील सकाळ कार्यालयात होणार आहे.
स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात शेवग्याला नियमित मागणी असून, आयुर्वेद औषधींमध्येही वापर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर या पिकाच्या शेतीबाबत माहिती देणारी ही कार्यशाळा शेतकरी, नवउद्योजक, महिला बचत गट, अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करू इच्छिणारे आदींसाठी उपयुक्त आहे.
-----------
कार्यशाळा कधी : रविवार, २५ ऑक्टोबर
कुठे : सकाळ कार्यालय, प्लॉट नं. ७, एन-१, सिडको टाऊन सेंटर, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर.
वेळ : सकाळी १०ः००
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्कः ८४८४८११५४४, ८४८४८२२१६६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.