छत्रपती संभाजीनगर

दीवाळीत गड-किल्ल्यांच्या ‘दुर्गोत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी

CD
गड-किल्ल्यांच्या दुर्गोत्सवात सहभागाची संधी -------------- -५ ते २५ नोव्हेंबरदरम्यान ऑनलाइन नोंदणीची सुविधा सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. १५ ः महाराष्ट्राची ऐतिहासिक, सांस्कृतिक, शौर्यपरंपरा नव्या पिढीपर्यंत पोचविण्यासह गड-किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृतीसाठी दिवाळीत ‘दुर्गोत्सव २०२६’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाची नोंदणी ता. ५ ते २५ नोव्हेंबर दरम्यान ऑनलाइन करता येणार आहे. यंदाही दीवाळी सुट्ट्यांत घरे, गृहसंकुल, शैक्षणिक परिसर किंवा उपलब्ध जागेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारून नागरिकांना सहभागी होता येणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयानुसार २०२५ मध्ये (Maratha Military Landscapes of India) या नावाने राज्यातील १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचा दर्जा प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बदलत्या काळात पारंपरिक सांस्कृतिक प्रथा-परंपरांचे जतन करणे आवश्यक आहे. दीवाळीच्या सुट्ट्यांत लहान-मोठ्यांनी एकत्र येऊन गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करण्याचा उपक्रम व्यापक करण्याचा उद्देश आहे. दुर्गोत्सवात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी (https://www.amrutdurgotsav.com/) वर नोंदणी करावी. स्वतः तयार केलेल्या किल्ल्याच्या प्रतिकृतीसोबत सेल्फी किंवा छायाचित्र काढून ते संकेतस्थळावर अपलोड करताना नोंदणी अर्जामध्ये वैयक्तिक व संपर्कविषयक माहिती अचूकपणे लिहावी. संस्थेमार्फत प्राप्त नोंदणी आणि छायाचित्रांची प्राथमिक पडताळणी करण्यात येईल. नोंदणी व छायाचित्र वैध आढळल्यानंतर संबंधित सहभागीला डिजिटल स्वरूपातील अभिनंदन पत्र उपलब्ध करून देण्यात येईल. दुर्गाची प्रतिकृती स्वतः तयार केलेली असणे आवश्यक आहे. इंटरनेट किंवा सोशल मीडियावरून घेतलेली छायाचित्रे अथवा व्हिडिओ अपलोड करून सहभाग नोंदविता येणार नाही. छायाचित्रात सहभागी व्यक्ती, दुर्गाची प्रतिकृती स्पष्ट दिसावी. एकाच छायाचित्राचा पुनर्वापर, बनावट छायाचित्र किंवा चुकीची माहिती आढळल्यास संबंधित नोंदणी अमान्य करण्यात येऊ शकते. प्रतिकृती तयार करताना सार्वजनिक रस्ते, पादचारी मार्ग, अग्निसुरक्षा मार्ग किंवा सार्वजनिक वापराच्या जागांवर अडथळा निर्माण होणार नाही, कोणाच्याही मालमत्तेचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. पर्यावरणपूरक व सुरक्षित साहित्याचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे. दुर्गोत्सवात जगातील कोणत्याही व्यक्तीला, कुटुंबाला, संस्थेला, गृहसंकुलाला, गटाला किंवा शैक्षणिक संस्थेला सहभागी होता येईल. सहभाग पूर्णपणे ऐच्छिक असून, डिजिटल अभिनंदनपत्र हे केवळ सहभागाची नोंद म्हणून देण्यात येणार आहे. त्यातून कोणताही रोख किंवा आर्थिक लाभ, पारितोषिक अथवा अन्य आर्थिक हक्क निर्माण होणार नाही. दुर्गोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाची ओळख नव्या पिढीला करून देण्यासह गड-किल्ल्यांविषयी अभिमान, संवर्धनाची भावना आणि सामाजिक सहभाग वाढविण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘अमृत’चे जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे यांनी केले आहे. -----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army Alert: भारतात घुसण्यासाठी 500 दहशवादी रेडी! 'पीओके'मध्ये लपून बसल्याची माहिती; लष्कराकडे महत्त्वाचे इनपुट्स

US Work Permit Rules: ट्रम्प यांचा भारतीयांना मोठा झटका! वर्क परमिट संपल्यावर नोकरी जाणार?

Mumbai: १० वर्षीय मुलीनं १८ महिन्यांच्या बाळाला इमारतीवरून खाली फेकलं, गोरेगावात काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Bank Holiday: 15 ते 31 ऑक्टोबरदरम्यान बँकांना 12 दिवस सुट्ट्या! महाराष्ट्रात कधी बंद राहणार बँका? पाहा संपूर्ण यादी

Latest Marathi News Update : जुन्नर तालुक्यात खरीप पिकांचे पंचनामे आजपासून सुरू

SCROLL FOR NEXT