पर्यटन राजधानीत ‘इको हॉटेल्स’चा प्रकल्प
---
संभाजीनगरात ऑक्टोबरमध्येच कामकाज सुरू करण्याचे प्रस्तावित
---
छत्रपती संभाजीनगर, ता. १५ ः जागतिक वारसास्थळांमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे केंद्र असलेल्या छत्रपती संभाजीनगरात ‘इको हॉटेल्स अँड रिसॉर्टस लिमिटेड’चा नवा प्रकल्प याच महिन्यात सेवेत दाखल होणार आहे. मंगळवारी (ता. १३) झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ऑक्टोबर २०२६ दरम्यान शहरातील ‘द इको सत्त्व हॉटेल’चे प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्याचे व्यवस्थापनाने प्रस्तावित केले.
या बैठकीत कंपनीच्या देशभरातील चालू हॉटेल्सची कामगिरी आणि आगामी प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल ऑक्टोबर महिन्यात, तर म्हैसूर (कर्नाटक) येथील हॉटेल आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या चौथ्या तिमाहीत सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले. पर्यटन राजधानीत या हॉटेलच्या आगमनामुळे शहरात पर्यटनासह व्यावसायिक परिषदांसाठी येणाऱ्या देशी-विदेशी पाहुण्यांना पर्यावरणपूरक आणि उच्च दर्जाच्या आदरातिथ्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.
---
५० कोटी रुपयांपर्यंतचा निधी उभारणार
कंपनीच्या विस्तार योजनांना गती देण्यासाठी संचालक मंडळाने प्राधान्य तत्त्वावर, खासगी वाटप किंवा पात्र गुंतवणूकदार व प्रवर्तकांकडून ५० कोटी रुपयांपर्यंतचा निधी उभारण्यास तत्त्वतः मंजुरी दिली आहे. आवश्यक त्या कायदेशीर, वैधानिक आणि भागधारकांच्या मंजुरीनंतर ही निधी उभारणी प्रक्रिया राबवली जाणार आहे. कंपनीच्या सचिव हिना सुपाडिया यांनी ही माहिती बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला (बीएसई) दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.