((लीड)))
---
दहा टक्के पाणीसाठा राखीव ठेवणार
---
आपत्कालीन वापरासाठीचे नियोजन, १०४ प्रकल्पांत ६८ टक्के जलसाठा
---
सकाळ वृत्तसेवा
नांदेड, ता. १४ : जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करून ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करावी. प्रत्येक प्रमुख जलाशयातील उपयुक्त जलसाठ्यांपैकी किमान १० टक्के साठा आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवावा, असे निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले. जिल्ह्यातील १०४ प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी ६८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांतील जलसाठा तसेच आगामी काळातील पाणीपुरवठ्याच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला.
बैठकीस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता इ. मा. चिश्ती आणि जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी अनिल कांबळे उपस्थित होते.
---
पाणीवाटप करताना विचार करावा
पावसाचे प्रमाण कमी राहणे किंवा कोरड्या कालावधीत वाढ होणे अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी प्रत्येक प्रमुख जलाशयातील उपयुक्त जलसाठ्यांपैकी किमान १० टक्के साठा राखून ठेवण्यात येणार आहे. पाणीवाटप करताना या राखीव साठ्याचा विचार करावा, अशा सूचना सावे यांनी दिल्या.
----
पाण्याचा अपव्यय टाळण्याचे निर्देश
शहरातील उद्याने आणि स्टेडियमसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर टाळावा. औद्योगिक वसाहतींनी किमान ३० टक्के पाण्याचा पुनर्वापर करावा. अवैध पाणीउपसा आणि पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले. नांदेड महापालिका क्षेत्रातील पाणीगळती रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.
---
उन्हाळ्यातील टंचाईसाठी पूर्वनियोजन
मार्च-एप्रिलमध्ये पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता असलेल्या गावांची आताच ओळख करून पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे. टंचाईचा दरमहा आढावा घेऊन नागरिकांमध्ये पाणीबचतीबाबत जनजागृती करावी, असे निर्देश देण्यात आले. उपलब्ध जलसाठ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि पाण्याची बचत करून आगामी उन्हाळ्यातील संभाव्य टंचाई टाळण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.