Manoj Jarange  esakal
छत्रपती संभाजीनगर

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या निधनाची पसरवली खोटी बातमी, जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

Manoj Jarange: मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी आपले बेमुदत उपोषण स्थगित केल्याची घोषणा केली आहे. मराठा आरक्षणासाठी ते सातत्याने आंदोलन करत आहेत. मराठा समाजाला इतर मागासवर्गीय (ओबीसी) अंतर्गत आरक्षण द्यावे, अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे.

Sandip Kapde

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या निधनाची खोटी बातमी पसरवणाऱ्या एका यू ट्यूबर वर छत्रपती संभाजी नगर शहरातील जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यूज विथ कोमल असा या व्यक्तीच्या यूट्यूब चॅनलचं नाव असून त्याने मनोज जरांगे पाटील यांच्या निधनाची खोटी बातमी पसरवून एकच खळबळ उडवून दिली होती.

त्यानंतर जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांनी लेखी तक्रार दाखल करून जवाहर नगर ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान नेमकी ही व्यक्ती कोण या घटनेचा अधिक तपास आता सायबर पोलीस करत आहे. साम टिव्हीने याबाबत वृत्त दिले आहे.

मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी आपले बेमुदत उपोषण स्थगित केल्याची घोषणा केली आहे. मराठा आरक्षणासाठी ते सातत्याने आंदोलन करत आहेत. मराठा समाजाला इतर मागासवर्गीय (ओबीसी) अंतर्गत आरक्षण द्यावे, अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे. छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे आणि शंभुराद देसाई यांनी मंगळवारी अंतरवली सराटीला भेट दिली होती.

जरांगे यांनी सरकारला एक महिन्याचा वेळ दिला आहे. काय आहे मनोज जरांगे यांची मागणी? मराठा आरक्षणासाठी कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे करत आहेत. संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि सगे-सोयरे बाबत अमलबजाणी करण्यात यावी, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. मराठा आरक्षणाचा हा प्रश्न सुटला नाही तर यावर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा जागांवर उमेदवार उभे करू. मग आपण आरक्षण देणारे होऊ, घेणारे नाहीस, असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला. 

मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी आपले बेमुदत उपोषण स्थगित केल्याची घोषणा केली आहे. मराठा आरक्षणासाठी ते सातत्याने आंदोलन करत आहेत. मराठा समाजाला इतर मागासवर्गीय (ओबीसी) अंतर्गत आरक्षण द्यावे, अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे.

छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे आणि शंभुराद देसाई यांनी मंगळवारी अंतरवली सराटीला भेट दिली होती. जरांगे यांनी सरकारला एक महिन्याचा वेळ दिला आहे.

काय आहे मनोज जरांगे यांची मागणी?

मराठा आरक्षणासाठी कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे करत आहेत. संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण आणि सगे-सोयरे बाबत अमलबजाणी करण्यात यावी, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.

मराठा आरक्षणाचा हा प्रश्न सुटला नाही तर या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा जागांवर उमेदवार उभे करू. मग आपण आरक्षण देणारे होऊ, घेणारे नाहीस, असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand School Shooting : थायलंड हादरले ! आठवीच्या विद्यार्थ्याचा शाळेत अंदाधुंद गोळीबार; शिक्षकासह दोघांचा मृत्यू, १० विद्यार्थी गंभीर जखमी

Cricketer Retirement: चक्क २५ व्या वर्षीच क्रिकेटमधून निवृत्ती! युवा वेगवान गोलंदाजाचा धक्कादायक निर्णय

Jalgaon Flyover Proposal : जळगाव महामार्गावर होणार 3 नवीन उड्डाणपूल! खासदार स्मिता वाघ यांच्या प्रस्तावाला गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद, 'त्या' पुलाचीही घेतली गंभीर दखल

Marathi News Live Updates : लोकसभेचे कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब

Hardik Panyda Trade: २५ कोटीसह कर्णधारपदही मिळणार! हार्दिक पांड्यासाठी नवी फ्रँचायझी मैदानात; Mumbai Indians ला दिलीय अशी ऑफर, जी नाकारता येणार नाही...

SCROLL FOR NEXT