छत्रपती संभाजीनगर

रक्तदान शिबिरांचे आयोजन करून हेल्मेटचे वाटप

CD
अँकर पान १ --- LTR19HTP03.jpg लातूर ः येथील आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनच्या वतीने रक्तदान करणाऱ्यांना हेल्मेट देण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे डॉ. पवन लड्डा, शहर वाहतूक शाखेचे मनोज जिरगे. ---- उत्सव भक्तीचा, उपक्रम समाजसेवेचा १ हजार १६० रक्तदात्यांना हेल्मेट, गणेश मंडळांचा सामाजिक उपक्रमावर भर --- सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. १९ ः जिल्ह्यात वाढते अपघात आणि त्यामध्ये होणारी जीवितहानी रोखण्यासाठी लातूर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने हेल्मेट सक्तीबरोबरच सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. पोलिसांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत यंदा लातूर जिल्ह्यातील विविध गणेश मंडळांनी समाजोपयोगी उपक्रम हाती घेत रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रक्तदात्यांना हेल्मेटचे वाटप केले आहे. यात आतापर्यंत गणेश मंडळानी घेतलेल्या रक्तदान शिबिरात एक हजार १६० जणांनी रक्तदान केले असून त्यांना मंडळांच्या वतीने हेल्मेट देण्यात आले आहे. गणेश मंडळांच्या या बदलत्या भूमिकेचे लातूर पोलिस दलाकडून कौतुक करण्यात येत आहे. तोंडार (ता. उदगीर) येथील बसवेश्वर तरुण गणेश मंडळ, युवा गणेश मंडळ (कुमठा खुर्द) यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २६१ नागरिकांनी रक्तदान केले. अहमदपूर येथे मानाचा गणपती व्यापारी गुमास्ता व हमाल गणेश मंडळाच्या रक्तदान शिबिरात १६१ जणांनी रक्तदान केले. येथील छत्रपती गणेश मंडळ, मोतीनगर तसेच सुवर्ण गणेश मंडळ, सराफा लाइन यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ७१ नागरिकांनी रक्तदान केले. उदगीर येथे राजस्थानी युवक गणेश मंडळाच्या शिबिरात २०० जणांनी तर, खंडाळी येथील राजमुद्रा गणेश मंडळ व ढाळेगाव येथील गणेश मंडळांच्या शिबिरात १२५ लोकांनी सहभाग घेतलेला आहे. औसा हद्दीमध्ये वीरशैव गणेश मंडळाच्या शिबिरात ६०, मुरूडचा महाराजा गणेश मंडळ आणि शिवगड गणेश मंडळाच्या शिबिरात २००, जय हनुमान गणेश मंडळ (बोंबळी खुर्द) यांच्या वतीने रक्तदान शिबिरात ६० जणांनी रक्तदान केले. आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ८१ नागरिकांनी सहभाग घेतला. या सर्व शिबिरात रक्तदात्यांना हेल्मेट भेट देण्यात आले आहे. -- रक्तदानासोबत रस्ता सुरक्षेचा संदेश लातूर जिल्हा पोलिसांच्या हेल्मेट वापराबाबतच्या जनजागृतीला प्रतिसाद देत गणेश मंडळांनी रक्तदानासोबत रस्ता सुरक्षेचा संदेशही दिला. तोंडार, कुमठा खुर्द, अहमदपूर, उदगीर, खंडाळी, ढाळेगाव, औसा, मुरुड, बोंबळी खुर्द आदी ठिकाणी या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. रक्तदात्यांना हेल्मेट देत ‘रक्तदानातून जीव वाचवा आणि हेल्मेट वापरून स्वतःचा जीव सुरक्षित ठेवा’, असा दुहेरी संदेश देण्यात आला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करणाऱ्या मंडळांच्या या उपक्रमाचे पोलिस दलाकडून कौतुक करण्यात येत आहे.

Pune Accident: ससूनमधून परतले, जेवणासाठी महामार्गावर उतरले; काही क्षणांतच सहाय्यक फौजदारावर काळाचा घाला, अज्ञात वाहनाची धडक अन्..

Latest Marathi News Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल

मामा-भाच्यात असं काय घडलं? राजगुरूनगरमध्ये धक्कादायक घटना |

Rohit Sharma: वडापाव नाही, तर टेन्शनच्या वेळी आईच्या हातचा 'हा' पदार्थ आहे कम्फर्ट फूड; रोहितने केला खुलासा

Satara Accident News: ४६ दिवस मृत्यूशी झुंज; बंगळूर महामार्गावरील अपघातात गंभीर जखमी प्रतीक काळभोरचा अखेर मृत्यू, एकुलता एक मुलगा गमावला

SCROLL FOR NEXT