अंबादास दानवे आणि पालकमंत्री भुमरे Sakal
छत्रपती संभाजीनगर

भर बैठकीत अंबादास दानवे आणि पालकमंत्री भुमरे यांच्यात बाचाबाची! सत्तार देखील भिडले | Sandipan Bhumare-Ambadas Danve

दत्ता लवांडे

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे आमदारांना देण्यात येणाऱ्या निधीवरून एकमेकांना भिडले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या दोघांमध्ये चांगलीच शाब्दिक बाचाबाची झाली.

विरोधी पक्षातील आमदारांना निधी देण्यात येत नाही असा आरोप केल्यानंतर पणन मंत्री अब्दुल सत्तार आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री तथा रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी दानवे यांचा एकेरी उल्लेख केला. त्यानंतर यांच्यामध्ये चांगलीच शाब्दिक बाचाबाची झाली आणि भर सभेमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला.

एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत या लोकप्रतिनीधींची मजल गेली आहे. याप्रकरणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये ही बैठक सुरू होती. पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मतदारसंघातील एका कामासंदर्भातील निधीचा मुद्दा उपस्थित केला असताना संदीपान भुमरे यांच्याकडून ठाकरे गटाच्या आमदारांवर अन्याय होतो, निधी वाटपामध्ये भेदभाव केला जातो असा आरोप अंबादास दानवे यांनी केला. त्यांच्या या आरोपानंतर वाद पेटला.

"प्रत्येकाला वाटतं आम्ही सत्तेमध्ये नसलो तरी आम्हाला निधी जास्त मिळाला पाहिजे. पण जो सत्तेत असतो त्याला निश्चितच निधी जास्त मिळतो हा अलिखित नियम आहे. पुर्वी तुम्हाला जो निधी मिळत होता त्यामध्ये कमतरता झाली नाही मग आता तुम्हाला वाढीव निधी कशाला पाहिजे?" असं मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT