sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : घराघरांत महागाईची फोडणी

लसूण ४००, अद्रक दोनशे रुपये किलो; कांद्याचीही शंभरीकडे वाटचाल

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : किरकोळ बाजारातील भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. फोडणीसाठी लागणारे लसूण, अद्रक आणि कांद्यांच्या किंमत वाढल्यामुळे घरा-घरांतील महिन्याचे बजेट कोलमडले आहे.सोमवारी (ता. चार) किरकोळ बाजारात लसूण ३६० ते ४०० रुपयांनी विक्री झाला. त्याच पाठोपाठ अद्रकीचा दर दोनशे रुपये किलोपर्यंत गेला आहे. होलसेलपेक्षा किरकोळ बाजारात पालेभाज्या, फळांच्या किमतीत वाढतच चालल्या असल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले.

लसणाची आवक बाजार समितीत कमी झाली आहे. यामुळे किरकोळ बाजारात लसणाच्या किमतीने उसळी घेतली. यासह लासूर स्टेशन, वैजापूर, नाशिक या भागांतून शहरात विक्रीसाठी येणाऱ्या कांद्याची आवक कमी झाल्यामुळे किरकोळ बाजारात कांदा भाव खात आहे. २० ते ३० रुपये किलो मिळणारा कांदा सध्या ६० ते ८० रुपये किलोने विक्री होत आहे. काही ठिकाणी तर कांदा शंभर रुपये किलोने विक्री झाला. किरकोळ बाजारात लसूण हा ८० ते ९० रुपये पावशेर होता. तर अद्रकही ५० ते ६० रुपये पावशेरप्रमाणे विक्री झाले आहे.

किरकोळ विक्रेता हा बाजार समितीतून पालेभाज्यांचा माल घेतो. शहरात वेगवेळ्या भागांत पालेभाज्या व फळभाज्यांचा दर वेगवेगळा आहे. किरकोळ बाजारात लसूण ३६० ते ४०० रुपये किलोने विक्री झाला. अद्रकीला मागणी आहे पण आवक कमी असल्याने अद्रकीची १८० ते २०० रुपये किलोने विक्री झाली. कांदेही ७० ते ८० रुपये किलोने विक्री झाले. भविष्यात ते १०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

— राजू शेळके, किरकोळ भाजीपाला विक्रेते.

अद्रकची थेटबांधावरूनच खरेदी

कन्नड, फुलंब्री तालुक्यातील बाजार समितीसह शहरात अद्रक विक्रीसाठी येते. मात्र, गेल्या वर्षभरापासून व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येत आहेत. यामुळे बाजार समितीत केवळ १० टक्के आवक होत आहे. जागेवर चांगला भाव मिळत असल्याने अद्रक उत्पादक शेतकरी हा तेथेच व्यवहार करीत आहे. यामुळे येथील चांगला माल इतर शहरात जात आहे. आवक कमी झाल्याने भाववाढ होत असल्याचे बाजार समितीतर्फे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT