एमजीएममध्ये जागतिक अन्न दिन उत्साहात
सिडको, ता. १८ ः महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या जैवविज्ञान व तंत्रज्ञान संस्थेतर्फे बुधवार ते शनिवार (ता. १४ ते १७) जागतिक अन्न दिनानिमित्त चारदिवसीय उपक्रम राबविण्यात आला. पोस्टर सादरीकरण, खाद्यपदार्थ प्रदर्शन आणि अन्नविषयक चित्रफीत निर्मिती स्पर्धांसह औद्योगिक भेटी व व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले.
महानंदा दुग्धशाळा आणि गांधेली येथील अन्न व दुग्धप्रक्रिया प्रकल्पांना भेट देऊन विद्यार्थ्यांनी गुणवत्ता नियंत्रण, स्वच्छता व अन्नसुरक्षेची माहिती घेतली. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे माजी प्रादेशिक अधिकारी सुदाम थोटे, डॉ. अजित एस. खोजारे, डॉ. सय्यद खाजा आरिफुद्दीन, डॉ. स्वप्निल कोकाटे, अन्नसुरक्षा अधिकारी फरीद सिद्दीकी, डॉ. हृषिकेश काकडे आणि अमरीन कादरी यांनी मार्गदर्शन केले. कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू प्रा. डॉ. विलास सपकाळ आणि कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. संस्थेच्या संचालिका डॉ. अर्चना पंचे तर विभागप्रमुख डॉ. संजय हरके सहसंयोजक होते. प्राध्यापक समन्वयक डॉ. श्रुतिका के. देव आणि कल्याणी थोटे यांच्यासह डॉ. मन्मथ डी. सोनटक्के, डॉ. सचिन व्ही. मस्के, प्राजक्ता सी. शिंगणे, धम्मरत्ना ए. ठोके (गुठके) आणि मुक्तानंद लोंढे यांनी सहकार्य केले. अन्नाची गुणवत्ता, पोषण आणि अन्नप्रक्रिया उद्योगातील संधींबाबत जागरूकता निर्माण करणे हा उपक्रमाचा उद्देश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.