छत्रपती संभाजीनगर

हिंगोलीत आज रावण दहनाचा थरार!

CD
((फोटो येणार आहे)) --- हिंगोलीत आज रावण दहनाचा थरार! ----- रात्री ११.५७ चा मुहूर्त; रामलीला मैदानावर हजारो नागरिक राहणार उपस्थित ----- हिंगोली, ता. १९ : भारतात म्हैसूरनंतर दुसऱ्या क्रमांकाचा दसरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंगोली येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवाचे विशेष आकर्षण असलेल्या रावण दहनाची तयारी महोत्सव समितीच्या वतीने पूर्ण झाली असून, मंगळवारी (ता. २०) रात्री ११.५७ च्या मुहूरतावर रामलीला मैदानावर ५१ फूट उंच रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे. शहरातील रामलीला मैदानावर ११ ऑक्टोबरपासून ऐतिहासिक दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या महोत्सवाचे १७२ वे वर्ष असून, या महोत्सवात भरविण्यात आलेल्या कृषी व औद्योगिक प्रदर्शनात विविध प्रकारचे मनोरंजनाचे साहित्य दाखल झाले आहे. महोत्सवात रात्री उशिरापर्यंत गर्दी होत आहे. महोत्सव समितीच्या वतीने धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच विविध स्पर्धाही घेण्यात येत आहेत. दसरा महोत्सवाचे खास आकर्षण असलेल्या रावण दहनाच्या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून, रात्री ११.५७ ला रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे. यावेळी फटाक्यांची आतषबाजी होणार आहे. या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, अधिकारी, दसरा समितीच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत. ----- पुतळ्यासाठी अडीचशे मीटर कपडा, बांबूंचा वापर दसरा महोत्सवात ५१ फुटी रावणाचा पुतळा तयार करण्यासाठी जवळपास २०० ते २५० मीटर कपडा, ट्रॅक्टरभर गवत, जवळपास १५० ते २०० बांबू, कागद, फटाके यांसह इतर साहित्याचा वापर करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली येथील बमरुले कुटुंबीयांच्या वतीने रावणासह बिभीषण, हनुमान, गरूड, जटायू आदी पुतळे तयार करण्यात आले आहेत. --- आयोध्यातील कलावंत सादर करणार युद्धप्रसंग घटस्थापनेपासून येथील रामलीला मंचावर रामलीलेचे आयोजन करण्यात आले असून, आयोध्या येथील कलावंतांच्या वतीने रामायणातील विविध प्रसंग सादर करण्यात येत आहेत. दसऱ्याच्या दिवशी प्रभू श्रीराम-रावणातील युद्ध व रावणवधाचा प्रसंग सादर करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Result 2026 : एकटा बास! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ३ मंत्री, २ खासदार, १० आमदारांना पुरून उरले सतेज पाटील; वाचा विजयी उमेदवारांची फायनल यादी

Parenting style: पालकांनो सावधान! तुमच्या 'या' एका चुकीमुळे मूल जाऊ शकतं नैराश्यात; १५ वर्षांच्या अभ्यासातून खुलासा...

Latest Marathi News Live Update : प्यारे खान यांच्या भेटीनंतर गरबा मंडळाचं शुद्धीकरण

Sawai Gandharva Bhimsen Festival : यंदाचा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ १३ ते १७ जानेवारीमध्ये; प्रथमच फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजन

Gokul Election Satej Patil : गोकुळच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ; सतेज पाटील यांची तातडीने धाव अभिजित तायशेटे आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी

SCROLL FOR NEXT