ICAI CA Result 2024 Chikalthana farmer daughter Bhagyashree become chartered accountant Sakal
छत्रपती संभाजीनगर

ICAI CA Result 2024 : चिकलठाण्याच्या शेतकऱ्याची लेक झाली चार्टर्ड अकाउंटंट

कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी असली की, यश हे तुम्हाला रोखू शकत नाही. हलाखीच्या परिस्थितीवरही मात करीत सेलू तालुक्यातील चिकलठाणा बुद्रूक येथील भाग्यश्री ही चार्टर्ड अंकौंटंट झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

देवगावफाटा : कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी असली की, यश हे तुम्हाला रोखू शकत नाही. हलाखीच्या परिस्थितीवरही मात करीत सेलू तालुक्यातील चिकलठाणा बुद्रूक येथील भाग्यश्री ही चार्टर्ड अंकौंटंट झाली आहे. परिस्थितीशी संघर्ष करून मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे.

घरातील आर्थिक विवंचना, कुटुंबात कोणाचेही उच्च शिक्षण नाही. या आर्थिक विवंचनेमुळे वडील उद्धवराव जाधव हे दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम करतात. तर आई काशीबाई जाधव या देखील मोलमजुरी करून चरितार्थ चालवतात.

जाधव या कुंटुबियांकडे केवळ दोन एकर शेतजमीन असल्यामुळे आपल्या मुलींचे शिक्षण व कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर कठीण होता. त्यात मुलीचे शिक्षण पूर्ण करणे त्यांच्यापुढे एक मोठे आव्हान होते. परंतु, मुलगी लहानपणापासूनच खूप हुशार होती. त्यामुळे त्यांनी मुलीला उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतला.

भाग्यश्रीवर कौतुकांचा वर्षाव

भाग्यश्री हिचे प्राथमिक शिक्षण चिकलठाणा येथेच जि.प. शाळेत झाले व पुढील शिक्षण सेलू येथील नुतन महाविद्यालयात पूर्ण झाल्यानंतर वडिलांनी संभाजीनगर येथील देवगिरी काॅलेजमध्ये प्रवेश दिला. भाग्यश्रीने कठोर परिश्रम घेत मोठे यश मिळवून सी. ए. बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. आपल्या यशाचे श्रेय तिने‎ आपल्या आई-वडिलांना दिले. या यशामुळे ग्रामीण भागातील‎ चिकलठाणा बुद्रूक गावाचा नावलौकिक‎ वाढल्याने ग्रामस्थांनी तिच्यावर‎ कौतुकाचा वर्षाव केला.

चिकाटीने ध्येयाकडे‎ वाटचाल करा‎. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना‎ चांगल्या दर्जाचे शिक्षण घेणे अवघड‎ जात आहे. परिस्थितीमुळे अनेक‎ होतकरू विद्यार्थ्यांसमोर बरेच‎ अडथळे निर्माण होत आहेत.‎ परंतु, जिद्द, चिकाटीने आपल्या‎ ध्येयाकडे वाटचाल केल्यास यश‎ नक्कीच मिळते. विद्यार्थ्यांनी खचून‎ न जाता अभ्यासात सातत्य राखणे‎ गरजेचे आहे.‎

— भाग्यश्री उद्धवराव जाधव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT