छत्रपती संभाजीनगर

साहित्यिक अॅड. दिलीप कांबळे यांना ''आदर्श समाजसेवक'' पुरस्कार

CD
ॲड. दिलीप कांबळे यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार धाराशिव, ता. २० : सातेफळ (ता. कळंब) येथील ग्रामीण साहित्यिक व ‘वैरदावा’कार ॲड. दिलीप कांबळे यांना काव्यांगण साहित्य मंचतर्फे दिला जाणारा आदर्श समाजसेवक राज्यस्तरीय पुरस्कार २०२६ जाहीर झाला आहे. गेल्या ४० वर्षांपासून त्यांनी साहित्य, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या सेवेची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मंचचे संस्थापक अध्यक्ष विकास राठोड यांनी या पुरस्काराची घोषणा केली. हा पुरस्कार सोहळा रविवारी (ता.२५) उमरगा येथील पोदार इंग्लिश स्कूल येथे काव्यांगण दीपोत्सव राज्यस्तरीय कवी संमेलनात पार पडणार आहे. संमेलन अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक सुभाष सोनवणे, उद्‍घाटक आमदार प्रवीण स्वामी, स्वागताध्यक्ष प्राचार्य बी. पी. सिंग, तसेच डॉ. संजय राठोड व सुवर्णा पवार आदींच्या हस्ते हा सन्मान प्रदान केला जाईल. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रा. रवी सुरवसे, प्रा. राजा जगताप, विजय गायकवाड, तुकाराम गंगावणे, जयराज खुणे, ॲड. विश्वजित शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील साहित्यिक व मित्रपरिवाराकडून ॲड. कांबळे यांचे अभिनंदन करण्यात आले. ...... फोटो ः ॲड. दिलीप कांबळे OSM26B07250

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात मोठा खुलासा! आधी दुसऱ्या सेलिब्रिटीला संपवण्याचा होता प्लॅन, चौकशीत काय समोर आलं?

Dussehra Shopping: आज दसरा ;वाहन, सोने, गृह, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खरेदीवर ग्राहकांचा भर १,२०० कोटींची उलाढाल अपेक्षित

Latest Marathi News Live Update : "मोदी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जातील" संजय राऊतांनी सांगितला दिवस

Dussehra 2026: खंडेनवमी आणि दसरा यात नेमका काय फरक? शस्त्रपूजा नक्की कोणत्या दिवशी करावी?

Dussehra History : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दसरा कसा साजरा व्हायचा? इतिहासातील रंजक गोष्टी!

SCROLL FOR NEXT