गोदा पात्रातून वाळूचा अवैध
उपसा;दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
---------------
सात लाखांचा मुद्देमाल जप्त; आरोपी पसार
मानवत, ता.१७ (बातमीदार)ः तालुक्यातील रामपुरी गावाजवळ गोदावरी नदीपात्रातून वाळूचा अवैध उपसा सुरू असताना पोलिसांनी कारवाई केली. यावेळी ट्रॅक्टरचे हेड, त्याला जोडलेली लोखंडी किणी, फरांडी असा एकूण ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांना पाहताच वाळू उपसा करणारे दोघे घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शुक्रवारी (ता.१६) सायंकाळी साडे पाचच्या सुमारास रामपुरी गावाजवळ गोदावरी नदीपात्रातून वाळूचा अवैध उपसा सुरू असल्याचे आढळून आले. एका लाल रंगाच्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने तसेच त्याला जोडलेल्या लोखंडी किणी, फरांडीच्या मदतीने वाळू काढली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी कारवाई केली असता दोघे पोलिसांना पाहून पळून गेले. संबंधित ट्रॅक्टरचे हेड जप्त करण्यात आले असून त्याची किंमत अंदाजे ६ लाख रुपये आहे. त्याला जोडलेल्या लोखंडी किणी व फरांडीची किंमत अंदाजे १ लाख रुपये असून एकूण ७ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा परभणी येथील पोलिस हवालदार माणिक दत्तात्रय डुकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हवालदार पाळवदे हे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.