Court sakal
छत्रपती संभाजीनगर

अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा खून; मरेपर्यंत फोडावे लागणार दगड, कोर्टाचा निकाल | Crime News

जिल्हा व सत्र न्यायालयाने सदर आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

सकाळ डिजिटल टीम

भोकरदन : अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या पत्नीची हत्या करणाऱ्या रतन सांडू साळवे (वय ४०, रा. कुंभारी, ता.भोकरदन) यास जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.डी.भगत यांनी जन्मठेपेची व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.

भोकरदन तालुक्यातील कुंभारी येथील रतन साळवे याचे अनैतिक संबंधाच्या कारणावरून पत्नीशी नेहमी भांडण होत असे. आरोपी हा नेहमी पत्नीला व मुलांना मारहाण करीत असे त्यामुळे सततच्या त्रासाला कंटाळून आशा ही मुलगा व मुलगी यांना सोबत घेऊन काम करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे गेली होती.

काही दिवसांनी रतन हा गावात कामधंदा नसल्याने पत्नी आशाबाईकडे गेला होता. त्यानंतर ता. १५ जानेवारी २०२१ रोजी कुंभारी ग्रामपंचायतीचे मतदान असल्याने पती व पत्नी हे दोघेही मतदान करण्यासाठी गावी आले होते.

त्या दिवशी गावातच स्वतःच्या घरी मुक्कामी राहिले होते. ता.१६ जानेवारीला सायंकाळी साडेपाच वाजता आशा हिच्या घराला बाहेरून कुलूप लावलेले होते. खिडकीतून डोकावून पाहिले असता फिर्यादीला तिच्या नाका तोंडातून रक्त येत असल्याचे दिसून आले. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्यावर मयत आशाबाई यांना विजेचा शॉक देवून तसेच विषारी द्रव्य पाजून व लोखंडी रॉड मारून खून केल्याचे आढळून आले.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिस उपनिरीक्षक बी.टी. नागरगोजे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे या प्रकरणात एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी व मयताचा मुलगा, डॉक्टर, पंच, इतर साक्षीदार व तपासीक अंमलदार बी.टी. नागरगोजे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.

न्यायालयाने पुरावा व युक्तिवाद लक्षात घेऊन आरोपी रतन सांडू साळवे यास जन्मठेपेची व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अशोक बी. सोनवणे यांनी कामकाज पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT