आहारात आयोडीनयुक्त मिठ
वापरा ः डॉ. किशोर सुरवसे
परभणी, ता.२३ : दैनंदिन आहारात आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारे गलगंड, थायरॉइड विकार, बालकांच्या शारीरिक व मानसिक विकासावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी दैनंदिन आहारात नियमितपणे आयोडीनयुक्त मिठाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. किशोर सुरवसे यांनी केले आहे.
जागतिक आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण दिनानिमित्त आयोडीनचे महत्त्व आणि त्याच्या कमतरतेमुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. आयोडीन हे शरीराची योग्य वाढ होण्यासाठी, थायरॉइड ग्रंथीचे कार्य सुरळीत राहण्यासाठी आवश्यक असलेले सूक्ष्म पोषक तत्त्व आहे. शरीरात आयोडीनची कमतरता निर्माण झाल्यास गलगंड, थायरॉइडचे विविध विकार उद्भवू शकतात. मुख्यतः गरोदर माता माता, स्तनदा माता, लहान मुलांसाठी आयोडीनचे योग्य प्रमाण महत्त्वाचे आहे. त्याच्या कमतरतेमुळे बालकांच्या शारीरिक, मानसिक विकासावरही प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आयोडीन न्यूनता विकार टाळण्यासाठी नागरिकांनी आयोडीनयुक्त मिठाचा वापर करावा. मीठ खरेदी करताना त्यावरील लेबल तपासून ते आयोडीनयुक्त असल्याची खात्री करावी. साठवण हवाबंद डब्यात, कोरड्या ठिकाणी करावी. मिठाचे सेवन मर्यादित ठेवून संतुलित व पोषक आहाराचा अवलंब करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्रे, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून व विविध प्रशिक्षणाद्वारे आयोडीनच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनानुसार योग्य आहारविषयक सवयी अंगीकारून आयोडीन न्यूनता विकारांचे प्रतिबंध व नियंत्रणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरवसे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.