ज्वारीची बाजारात वाढलीय किंमत
-------------
जळकोट : ज्वारीचा दर थेट १०० रुपये किलोवर
जळकोट शहर,ता.१९ : बाजारात ज्वारीचे दर आता किलोमागे शंभर रुपयांवर पोचले आहेत. परिणामी गोरगरीब, मध्यमवर्गीयांच्या ताटातील भाकरीच गायब होण्याच्या मार्गावर आहे.
यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे. बहुतांश भागात खरीप ज्वारीचे पीकच आले नाही. काही भागातील तलाव भरलेले असले तरी ग्रामीण भागात चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आवक घटल्याने बाजारात ज्वारीची टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात चांगल्या प्रतीची ज्वारी ४५ ते ५० रुपये किलो दराने मिळत होती. आता घाऊक बाजारातच ज्वारी ८५ ते ९० रुपये किलो झाली असून, किरकोळ बाजारात ती १०० ते ११० रुपये किलोने विकली जात आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांच्या मते, पुढील दोन महिने पाऊस नाही आणि नवीन आवक नाही, त्यामुळे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. ज्वारी महाग झाल्याने लोक आता बाजरी आणि गव्हाकडे वळले आहेत, पण त्यांचे दरही वाढले आहेत. रब्बी हंगामातही ज्वारीची पेरणी दुष्काळामुळे घटणार आहे. सरकारने तातडीने बाजारात स्वस्त दरात ज्वारी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कोट---
यंदा खरीप ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले आहे. शेतकऱ्यांकडे विकायला मालच नाही. बाहेरून माल मागवावा लागत आहे, त्यामुळे वाहतूक खर्च वाढून वर शंभरीपार गेला आहे. दिवाळीपर्यंत दर १२० रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.
- संतोष पवार, अडत व्यापारी, जळकोट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.