छत्रपती संभाजीनगर

कळंबमध्ये तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद ७१ संघांचा सहभाग; विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना मिळाले व्यासपीठ

CD
कबड्डी स्पर्धेत ७१ संघांचा सहभाग कळंब, ता.२३ (बातमीदार) : जिल्हा क्रीडा कार्यालय, धाराशिव आणि छत्रपती शिवाजी महाविद्यालय, कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २१ व २२ ऑक्टोबर रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या दोन दिवसीय स्पर्धेत मुलांचे ४६, तर मुलींचे २५ अशा एकूण ७१ संघांनी सहभाग नोंदविला. १४,१७ आणि १९ वर्षांखालील वयोगटांतील खेळाडूंनी मैदानात कौशल्याची चुणूक दाखविली. मुलांच्या कबड्डी स्पर्धेचे उद्‍घाटन नायब तहसीलदार गोकुळ भराडिया यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले. स्पर्धेपूर्वी शहरातून क्रीडा जागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीचे उद्‍घाटन पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश टोणगे यांच्या हस्ते झाले. २२ ऑक्टोबरला मुलींच्या विविध वयोगटांतील कबड्डी स्पर्धा पार पडल्या. नगराध्यक्षा सुनंदा कापसे, नगरसेवक पूजा धोकटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हनुमंत माने, डॉ. विद्युलता पवार, मुख्याध्यापक हरिशचंद्र औताडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेवा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक कै. नरसिंग (अण्णा) जाधव यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून स्पर्धेचे उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार बालाजी अडसूळ, माधवसिंग राजपूत, संस्थेचे सचिव प्रा. संजय घुले, प्रा. राजाभाऊ चोरघडे, प्रा. नामदेव तोडकर, डॉ. शिवकुमार खबाले, लक्ष्मण मोहिते, तालुका क्रीडा समन्वयक सुबराव कांबळे, संजय मडके, रफियोद्दीन काजी, रमेश माळी, प्रवीण कांबळे, सुहास हौसलमल, सतीश गायकवाड, सुधाकर सुरवसे, सतीश कोळगे यांच्यासह तालुक्यातील क्रीडा शिक्षक उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्या संघांना संस्थेचे सचिव तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी ,संस्थेचे सहसचिव प्रा.संजय घुले आणि प्राचार्य डॉ.हनुमंत माने यांच्या हस्ते ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक सुबराव कांबळे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. राजाभाऊ चोरघडे यांनी केले. तर प्रा. विजय घोळवे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Spy Camera Allegation : पुण्यात शिक्षक-पदवीधरच्या मतदानात भाजपकडून स्पायकॅमचा आरोप, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; सुप्रिया सुळेंच्या आरोपाने खळबळ

दिवाळीला सुट्टी मागताना काळजी घ्या! WhatsApp वर बॉसचा OK मेसेज म्हणजे रजा मंजूर नव्हे; कर्मचाऱ्याची याचिका फेटाळली, प्रकरण काय?

Jarange Audio Clip: ''500 कोटींचं सोडा.. जरांगे पाटलांच्या विरोधात नेमकं चाललंय काय?'', राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, जवळची माणसं फोडून...

Marathi News Live Updates:मुलुंडमध्ये पुलाचे काम चार वर्षांपासून रखडले; काँग्रेसकडून पाहणी

Vastu Tips: दिवाळीपूर्वी घरात रंगकाम करताय? चुकीचा रंग आणू शकतो गरिबी! घर रंगवताना नक्की पाळा वास्तूचे 'हे' नियम...

SCROLL FOR NEXT