Sambhaji Nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : विद्यार्थ्यांचे अपहरण करून मारहाण ; १७ जणांवर गुन्हा,युवतीला धक्का दिल्याचे कारण

युवतीला धक्का दिल्याच्या कारणावरून टोळक्याने दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण केले. शहरातील मध्यवर्ती भागातील एका फ्लॅटमध्ये डांबून १७ जणांनी बांबू, रॉडने त्यांना बेदम मारहाण केली.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : युवतीला धक्का दिल्याच्या कारणावरून टोळक्याने दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण केले. शहरातील मध्यवर्ती भागातील एका फ्लॅटमध्ये डांबून १७ जणांनी बांबू, रॉडने त्यांना बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली असून बुधवारी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. छोटू ऊर्फ भाऊ झिरपे असे मुख्य संशयिताचे नाव असून, इतर १६ जणांचा शोध सुरू आहे.

सुदेश आणि त्याचा मित्र आदेश (दोन्ही नावे काल्पनिक) या दोघांनी खासगी कोचिंगमध्ये जेईई- ११ वीचे क्लास लावलेले आहेत. तेथेच सुनीता (काल्पनिक नाव) ही देखील शिकवणीला येते. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता शिकवणी झाल्यानंतर सुदेश आणि आदेश दुचाकीने घराकडे निघाले. मॉस्को कॉर्नरजवळ येताच पाठीमागून चार दुचाकींवरून आठजण आले. त्यातील एकाने दोघांनाही रोखले आणि शिवीगाळ करून मारहाण सुरू केली. ‘काय झाले’, असे विचारल्यावर ‘दुसरीकडे गेल्यावर तुला सांगतो’, असे म्हणून दोघांना बळजबरी दुचाकीवर बसून नागेश्वरवाडी येथील एका फ्लॅटवर नेले. तिथे आठ जण आधीपासूनच हजर होते. तेथे गेल्यावर ‘तुम्ही सुनीताला धक्का का दिला’, असे विचारून मारहाण करण्यास सुरवात केली.

व्हिडिओ शूट करून मारहाण

दोघांचे अपहरण करून फ्लॅटवर नेल्यानंतर काही वेळाने तेथे छोटू झिरपे आला. त्याने दोघांचे मोबाइल आणि घड्याळ काढून घेत ‘मी जे सांगेल ते म्हणा, मी व्हिडिओ शूट करत आहे’, असे सांगितले. दोघांनी म्हणायला नकार दिल्याने १७ जणांनी मारहाण सुरू केली. यात कपडे काढून बांबू आणि रॅाडने मारहाण केली. उठाबशा काढायला लावल्या.

पोलिसांत गेलात तर जिवे मारून टाकू!

मारहाणीनंतर संशयितांनी दोघांना अर्धनग्न करून उठाबशा काढायला लावल्या. याचे चित्रीकरण केले. यापुढे तरुणीला त्रास देणार नाही, असे बळजबरी वदवून घेतले. तसेच, पोलिस ठाण्यात गेले तर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दोघांना रात्री साडेआठ वाजता त्यांनी सोडून दिले. जखमी अवस्थेत घरी पोचल्यानंतर पालकांना त्यांनी सर्व हकिगत सांगितली. त्यांनी एमआयडीसी सिडको ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी मेडिकल मेमो देऊन घाटीत पाठविले. त्यानंतर याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली असून तपास उपनिरीक्षक सचिन जाधव करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : दिलासादायक ! राज्यात पाऊस परतणार; कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात धो धो कोसळणार, १० जिल्ह्यांना येलो अलर्ट

Navratri Upvas Recipe: उपवासाला तेच तेच खाऊन कंटाळा आलाय? बनवा खमंग अन् चटपटीत 'उपवासाचा समोसा'!

Mangalwedha Crime : जवळ झोपून न देणाऱ्या पत्नीचा रॉकेलने पेटवून खून; पतीस शिक्षा

Mumbai Crime : सीएसएमटीतून चिमुरडीचे अपहरण! १४ तासांत शोध, अपहरण करणाऱ्या महिलेला अटक; एक वर्षाच्या मुलीला आईच्या स्वाधीन केले

FDA Crime : कऱ्हाडमधुन एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा इशारा; राज्यात अन्नसुरक्षेसाठी कारवाई आणखी कडक करणार

SCROLL FOR NEXT