Sambhaji Nagar Loksabha constituency sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar Loksabha Constituency : तनवाणी-दानवे अखेर एकत्र ; मनोमिलन ,गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अढी दूर

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना शिवसेना ठाकरे गटात नाराजीचे सत्र सुरू आहे. उमेदवारीवरून सुरवातीला चंद्रकांत खैरे व अंबादास दानवे यांच्यात वाद उफाळला.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना शिवसेना ठाकरे गटात नाराजीचे सत्र सुरू आहे. उमेदवारीवरून सुरवातीला चंद्रकांत खैरे व अंबादास दानवे यांच्यात वाद उफाळला. त्यानंतर पदाधिकारी नियुक्तीवर जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी नाराज झाले. दानवे-खैरे संघर्ष मिटल्यानंतर आता खैरे यांनी दानवे-तनवाणी यांना एकत्र आणत पक्षात सर्व आलबेल असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न मंगळवारी (ता. नऊ) गुढीपाडव्यानिमित्त केला.

लोकसभा निवडणुकीच्या तिकिटावरून शिवसेना नेते खैरे व विधान परिषदेचे विरोधी पक्षनते दानवे यांच्यात सुरवातीला संघर्ष झाला. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद थांबला. दानवे यांनी खैरे यांच्या घरी जाऊन त्यांना पेढे भरवत वादाला पूर्णविराम दिला. त्यानंतर संघटनात्मक नेमणुकीवरून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी नाराज झाले.

शहरातील नियुक्त्या करताना आपल्याला विश्वासात न घेतल्याचा आरोप करत ते बैठकांपासून दूर राहिले. त्यानंतर चंद्रकांत खैरे स्वतः तनवाणी यांच्या गुलमंडीवरील कार्यालयात त्यांची मनधरणी करायला गेले होते.

तिथे सामोसे-कचोरीवर प्रदीर्घ चर्चाही झाली. पण, तनवाणी आपल्या भूमिकेवर ठाम होते. मात्र, एकमेकांना पाण्यात पाहणारे दानवे-तनवाणी मंगळवारी मात्र गुलमंडीवर एकत्र आले. हिंदू नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त गुलमंडीवर गुढी उभारली. शिवसेनेकडून दरवर्षी गुढीपाडव्याला गुलमंडी येथे उंच गुढी उभारली जाते.

या कार्यक्रमात खैरे यांच्या दोन्ही बाजूंना दानवे-तनवाणी उभे होते. त्यामुळे शिवसेनेतील दानवे-तनवाणी यांच्यातील नाराजी पाडव्याच्या निमित्ताने मिटली का? दोघे एकमेकांशी गोड गोड बोलले का? याची चर्चा कार्यक्रमस्थळी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT