छत्रपती संभाजीनगर

लातूर पोलिसांच्या १५७ गावांना भेटी

CD
लातूर पोलिसांच्या १५७ गावांना भेटी - ८ हजार ५५२ नागरिकांशी साधला संवाद लातूर, ता. १५ ः पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर सामूहिक उपाययोजना करण्यासाठी लातूर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने ‘पोलिस आपल्या गावामध्ये’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत लातूर पोलिसांनी १५७ गावांना भेटी देऊन ८ हजार ५५२ नागरिकांशी संवाद साधला आहे. लातूर जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक व आर्थिक समस्यांचा विचार करून ता. एक ऑक्टोबरपासून सुरु झालेला हा उपक्रम ३० नोव्हेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. या दोन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील एकूण १ हजार २१ गावांना भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या भेटींच्या माध्यमातून गावातील नागरिकांशी चर्चा करून पाणीटंचाईमुळे उद्‍भवू शकणाऱ्या समस्या, त्यांचे संभाव्य परिणाम आणि त्यावर सामूहिकरीत्या कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे शेती उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी निराश न होता संयमाने परिस्थितीचा सामना करावा, तसेच आर्थिक अडचणींमुळे कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, याबाबत पोलिसांकडून संवाद साधण्यात येत आहे. आर्थिक गरजेतून खासगी सावकारांकडून अवाजवी व्याजदराने कर्ज घेऊन भविष्यातील अडचणी वाढवून घेऊ नयेत, यासाठीही शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात येत आहे. गावागावांत सामाजिक कार्याची आवड असलेल्या, होतकरू आणि चारित्र्यसंपन्न तरुणांच्या सहभागातून ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात येत आहे. गावातील विविध समाजघटकांतील तरुणांना एकत्र आणून त्यांच्या मदतीने स्थानिक प्रश्नांवर लक्ष ठेवणे, सामाजिक सलोखा टिकविणे आणि संभाव्य समस्यांच्या काळात प्रशासनाला सहकार्य मिळवून देणे, यावर भर देण्यात येत आहे. -----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tulja Bhavani Temple : तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात सोलापूरच्या 'मटका किंग'चं फोटोसेशन; व्हीआयपी दर्शनावरून उडाळी खळबळ, मंदिरातील अनागोंदी कारभाराविरोधात संताप

South Solapur News: गॅस सिलिंडरच्या स्फोटात घर जळून खाक; कोळी कुटुंबाच्या मदतीला धावले महादेव कोगनुरे

Latest Marathi News Update : ज्ञानेश कुमारांमुळे मोदी सत्तेत आले : अभिजीत दिपके

Pune Leopard News: सिंहगडाच्या पश्चिमेकडे बिबट्याची दहशत; तासाभरात तीन दुचाकीस्वारांवर हल्ले, युवती जखमी

Yunus Shaikh: कैसे हराया... फेम सहर शेखच्या वडिलांना शिंदेसेनेत मानाचं पान, युनूस खान यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती

SCROLL FOR NEXT