छत्रपती संभाजीनगर

''आईचं घर''मधील मुलांसाठी एलआयसीकडून स्कूल व्हॅन

CD
लातूर ः येथील आईचं घर या प्रकल्पासाठी एलआयसीच्या वतीने ‘स्कूल व्हॅन’ देण्यात आली. यावेळी क्षेत्रीय व्यवस्थापक सनोज कुमार, अण्णासाहेब कदम, उदय सुटुंबेकर, मनोज समर्थ, विनायक वालवडकर, मिलिंद कुलकर्णी आदी. ‘आईचं घर’मधील मुलांसाठी एलआयसीकडून स्कूल व्हॅन सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. १४ ः दिव्यांग सक्षमीकरण विभागांतर्गत बोरीच्या श्री गजानन बहुद्देशीय संस्था संचलित ‘आईचं घर’ या दिव्यांग शैक्षणिक प्रकल्पातील संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांच्या बालगृहाला भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) छत्रपती संभाजीनगर विभागातर्फे ‘गोल्डन ज्युबिली फाउंडेशन योजनेअंतर्गत स्कूल व्हॅन भेट देण्यात आली. एलआयसीचे पश्चिम विभागाचे क्षेत्रीय व्यवस्थापक सनोज कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत या व्हॅनचा लोकार्पण सोहळा सोमवारी (ता. १२ ) उत्साहात पार पडला. प्रारंभी बालगृहातील लेझीम पथकाने ढोल-ताशांच्या गजरात उपस्थितांचे स्वागत केले. सनोज कुमार आणि क्षेत्रीय प्रबंधक अरुण राजदान यांच्या हस्ते व्हॅन संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली. अध्यक्ष अण्णासाहेब कदम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी एलआयसीचे वरिष्ठ मंडळ व्यवस्थापक उदय सुटुंबेकर, विपणन व्यवस्थापक मनोज समर्थ, विक्री व्यवस्थापक विनायक वालवडकर, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक मिलिंद कुलकर्णी, शाखा व्यवस्थापक जगदीश निमजे, स्मिता जोशी यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन गालिब शेख यांनी केले. -----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: बेशुद्ध लेकीला खांद्यावर घेऊन बाप पायीच निघाला; रुग्णवाहिकेतून उतरवलं, डॉक्टर म्हणाले, पोरं कशाला पैदा केले...

Nagpur News : डॉ. मयुरी येवले यांना मँचेस्टर विद्यापीठाची फेलोशिप; आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी निवड

Maharashtra Live News : "शेतकऱ्यांचा हा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही"; ५ हजारांच्या मदतीवरून अनिल देशमुखांची टीका

Dhirubhai Ambani: भारताला केवळ बचत नव्हे, तर गुंतवणुकीतून मालकी हक्क मिळवायला शिकवणारे गुजराती उद्योजक

अरबी समुद्राचं सुंदर दृश्य, दुर्मिळ चित्रांचा खजिना; 53 व्या मजल्यावरील माधुरी दीक्षितचं आलिशान घर पाहिलंत का?

SCROLL FOR NEXT