छत्रपती संभाजीनगर

सीसीटीव्हीचा धागा, पोलिसांची तत्परता

CD
सीसीटीव्हीमुळे सापडला हरवलेला मुलगा कडा स्थानकातून मुंबईकडे जाणाऱ्या बसमध्ये बसला; पोलिसांच्या तत्परतेने आईच्या कुशीत आष्टी, ता. १५ (बातमीदार) : आजी रागावल्यामुळे घरातून निघून गेलेला १२ वर्षांचा मुलगा मुंबईकडे जाणाऱ्या बसमध्ये बसल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले. या धाग्याच्या आधारे कडा पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. कडा पोलिसांची तत्परता, अहिल्यानगर पोलिसांची सतर्कता आणि स्नेहालयाच्या बालसंगोपन पथकाच्या मदतीने हरवलेला मुलगा अवघ्या १२ तासांत आईला सुखरूप मिळाला. कडा परिसरात मंगळवारी (ता. १३) रात्री ही घटना घडली. आजी रागावल्यामुळे मुलगा घरातून निघून गेला. बराच वेळ होऊनही तो घरी परतला नाही, त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली. आई आणि नातेवाइकांनी गावातील गल्ल्या, परिसर तसेच शेतशिवारात शोध घेतला. मात्र, मुलाचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर आईने कडा पोलिस चौकी गाठून हवालदार नंदकिशोर सवासे यांच्याकडे मदत मागितली. मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच हवालदार सवासे यांनी शोध सुरू केला. कडा बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, रात्री पावणेनऊच्या सुमारास मुलगा चौसाळा ते मुंबई जाणाऱ्या बसमध्ये एकटाच चढताना दिसला. या महत्त्वाच्या धाग्यामुळे त्याच्या प्रवासाची दिशा स्पष्ट झाली. तपासादरम्यान तो अहिल्यानगर येथे पोचल्याची माहिती मिळाली. अहिल्यानगर बसस्थानकावर एक लहान मुलगा एकटाच असल्याचे तेथील पोलिसांच्या निदर्शनास आले. बालकाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पोलिसांनी स्नेहालयाच्या चाइल्ड लाइन पथकाशी संपर्क साधला. त्यानंतर मुलाला स्नेहालयात सुरक्षित ठेवण्यात आले. दरम्यान, कडा येथील हवालदार सवासे यांनी संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून मुलाची ओळख आणि त्याच्या कुटुंबीयांची खातरजमा केली. ----- १२ तासांची प्रतीक्षा संपली मुलगा सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना अहिल्यानगर येथे पाठविण्यात आले. आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून स्नेहालयाने मुलाला त्याची आई आणि मामाच्या स्वाधीन केले. रात्रीपासून काळजीत असलेल्या आईला मुलगा सुखरूप दिसताच दिलासा मिळाला. ----- लेकरू आईच्या कुशीत सीसीटीव्ही फुटेजचा प्रभावी वापर, पोलिसांनी वेळीच साधलेला संपर्क आणि विविध यंत्रणांमधील समन्वय यामुळे बालकाचा शोध घेणे शक्य झाले. कडा पोलिस, अहिल्यानगर पोलिस आणि स्नेहालयाच्या पथकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे आईला तिचे हरवलेले लेकरू अवघ्या १२ तासांत पुन्हा मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Strict Action : मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग अन् भेसळीला पूर्ण बंदी! आयुक्त तुकाराम मुंढेंकडून कडक नियमावली जारी; नियम मोडल्यास थेट कारवाई

Medical Courses : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी शुक्रवारपर्यंत मुदतवाढ

Latest Marathi News Update: लैंगिक शोषणप्रकरणी कोऱ्हाळे खुर्द येथील तरुणावर गुन्हा

नाना पाटेकरांनी सिंहगडाच्या पायथ्याशीच फार्महाऊस का बांधलं? पुरुषोत्तम बेर्डेंनी सांगितलं कारण, म्हणालेले- इथून महाराजांचे...

Akola District Drought : दुष्काळाच्या झळा; लोणी गावातील दुग्ध व्यवसाय संकटात! पाणी आणि चाऱ्याअभावी पशुपालक हवालदिल; म्हशी विकण्याची वेळ

SCROLL FOR NEXT