छत्रपती संभाजीनगर

रब्बीत कमी पाण्याची

CD
करडई, हरभरा, ज्वारीला द्या प्राधान्य रब्बीत कमी पाण्याची पिके घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन ----- नांदेड, ता. १६ : परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला असून, भूजल पातळीत सरासरी २.५ मीटरने घट झाली आहे. आगामी काळात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता रब्बी हंगामात अधिक पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड टाळावी. ऊस, गहू, मका आणि चिया यांऐवजी कमी पाण्यात येणाऱ्या करडई, हरभरा आणि रब्बी ज्वारीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. संभाव्य एल निनोचा प्रभाव, पावसातील अनिश्चितता आणि घटती भूजल पातळी यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात पीक नियोजनाचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ अंदाजावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष पर्जन्यमान, जमिनीतील ओलावा आणि सिंचनासाठी उपलब्ध पाणी यांचा विचार करूनच पेरणी करावी. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास पेरणीची घाई करू नये, असेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. मध्यम काळ्या जमिनीत मर्यादित ओलावा असल्यास करडई, हरभरा आणि रब्बी ज्वारी ही पिके फायदेशीर ठरू शकतात. करडईसाठी परभणी सुवर्णा, परभणी कुसुम आणि पूर्णा या वाणांचा विचार करावा. खोल काळ्या जमिनीत पुरेसा अवशिष्ट ओलावा असल्यास ज्वारीच्या परभणी सुपर मोती, परभणी मोती आणि पीकेव्ही क्रांती या वाणांची निवड करावी. हरभऱ्यासाठी विजय, दिग्विजय, आकाश आणि जाकी-९२१८ या वाणांपैकी स्थानिक परिस्थितीला अनुकूल वाण निवडावा. कोरडवाहू शेतीसाठी शिफारस केलेल्या वाणांना प्राधान्य देऊन उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करावा. ----- शेतकऱ्यांना दिलासा पाण्याची उपलब्धता आणि जमिनीतील ओलावा लक्षात घेऊन केलेले पीक नियोजन संभाव्य पाणीटंचाईच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकते. त्यामुळे परिस्थितीचा अंदाज घेऊन कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड करावी, असे आवाहन कळसाईत यांनी केले आहे.

Death Penalty: मेरठ कोर्टाचा ऐतिहासिक निकाल! पतीला साप चावल्याचा बनाव करणाऱ्या पत्नीसह प्रियकराला फाशीची शिक्षा

Baramati News : सिलिकॉन व्हॅलीच्या धर्तीवर बारामतीत ‘इनोव्हेशन व्हॅली’ उभारणार! शरद पवार यांची घोषणा....

Pune Crime : अल्पवयीन मुलांकडून तरुणाचा निर्घृण खून; तिघेजण ताब्यात

Jharkhand Health : जिल्हा रुग्णालयांत सुरू होणार DNB पदव्युत्तर अभ्यासक्रम; आरोग्य विभागाचा पायलट प्रोजेक्ट

Farmer Scheme: शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून 5,000 रुपये मिळणार; कसा कराल अर्ज?

SCROLL FOR NEXT