बियाणे वितरण, प्रात्यक्षिकांसाठी मिळणार अनुदान
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. १६ : २०२६-२७ अंतर्गत रब्बी हंगामात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी जिल्ह्यातील इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान, कडधान्य आत्मनिर्भरता अभियान तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत शेतकऱ्यांना बियाणे वितरण आणि प्रात्यक्षिकांसाठी अनुदान दिले जाणार आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने २०२६-२७ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले असल्याने या योजनांमध्ये महिलांना प्राधान्याने लाभ दिला जाणार आहे. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग लाभार्थ्यांनाही यामध्ये प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (गळीतधान्य) भुईमूग, सूर्यफूल आणि करडई पिकांसाठी गट पीक प्रात्यक्षिके व प्रमाणित बियाणे वितरण केले जाणार आहे. यामध्ये भुईमूग प्रात्यक्षिकासाठी १४ हजार रुपये प्रतिहेक्टर तर प्रमाणित बियाण्यासाठी ११४ रुपये प्रतिकिलो, सूर्यफूल प्रात्यक्षिकासाठी ९ हजार रुपये प्रतिहेक्टर आणि बियाण्यासाठी ४७४ रुपये प्रतिकिलो, तर करडई प्रात्यक्षिकासाठी ८ हजार रुपये प्रतिहेक्टर आणि बियाण्यासाठी १०५ रुपये प्रतिकिलो अनुदान राहील. हरभरा पिकासाठी ५ वर्षाआतील प्रमाणित बियाणे वितरणासाठी ६० रुपये प्रति किलो, तर ५ वर्षावरील परंतु १० वर्षाआतील वाणासाठी ४० रुपये प्रतिकिलो, ऊस पिकासाठी एक डोळा पट्टा पद्धत व आंतरपीक प्रात्यक्षिकासाठी (ऊस+हरभरा) ९ हजार रुपये प्रतिहेक्टर, तर सुपर केन नर्सरीसाठी १० हजार रुपये किंवा खर्चाच्या ५० टक्के, तर गव्हासाठी सलग गट पीक प्रात्यक्षिके (९,००० रुपये प्रतिहेक्टर) आणि ज्वारीसाठी प्रमाणित बियाणे वितरणात १० वर्षांआतील वाणासाठी ३० रुपये प्रतिकिलो तर १० वर्षावरील वाणासाठी १५ रुपये प्रतिकिलो अनुदान दिले जाणार आहे.
शेतकऱ्यांनी स्वतः किंवा नजिकच्या सीएससी केंद्राफार्फत महाडीबीटी पोर्टलद्वाेर बियाणे वितरण, प्रात्यक्षिक किंवा सुपर केन नर्सरी या पर्यायांतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सागर खटकाळे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.