raj thackeray esakal
छत्रपती संभाजीनगर

राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच मनसे पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे औरंगाबादच्या दौऱ्यावर येण्यापूर्वीच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे औरंगाबादच्या दौऱ्यावर येण्यापूर्वीच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला आहे. येत्या १४ डिसेंबरला ठाकरे औरंगाबादेत येत असून ते मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) व शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आमदार अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या प्रसंगी देसाई म्हणाले, की मनसे गळक घर असून मनसेचे पदाधिकारी स्वगृही परत येत आहेत. शिवसेनेचा वाडा गळका नसून येथे प्रवेश मिळतो. पण बाहेर जाण्यासाठी कोणी दरवाजा उघडत नाही, असे त्यांनी सांगितले. (Aurangabad Mahapalika Nivadnuk)

सध्या औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागले आहेत. एमआयएमच्या काही माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी निवडणूक एकत्र लढणार आहे का ? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. जो-तो स्वबळाची भाषा करित आहे. औरंगाबादेत मनसेची दखल घ्यावी असे अस्तित्व दिसत नाही. त्यातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीच त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT