छत्रपती संभाजीनगर

सुरक्षेविना खांबावर चढवलेल्या ३४ वर्षीय मजुराचा विजेच्या शॉकने बळी

CD
ABD26J81557 मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; महावितरणचा निष्काळजीपणा कागदी नोटिसांचा खेळ उघड; अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ठेकेदार झाले मोकाट नितीन चव्हाण ः सकाळ वृत्तसेवा बीड, ता. १७ : महावितरणचा कमालीचा भोंगळ कारभार आणि कंत्राटदार एजन्सीच्या बेफिकीर, नफेखोर वृत्तीमुळे बीड शहरात एका ३४ वर्षीय निष्पाप मजुराला अत्यंत भयानक पद्धतीने आपला जीव गमवावा लागला आहे. सुरक्षेचे कोणतेही साधन न देता मजुराला मृत्यूच्या दाढेत, विजेच्या खांबावर चढवून मरणाच्या दारात ढकलणाऱ्या या व्यवस्थेने एका गरिबाचा उभा संसार उघड्यावर पाडला आहे. शहरातील बालेपीर भागातील गोरे वस्तीत काम करत असताना विजेचा जोरदार धक्का बसून अशोक माणिक खटाने (वय ३४, रा. कर्जनी, ता. बीड) या होतकरू मजुराचा जागीच तडफडून करुण अंत झाला. बुधवार, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी घडलेल्या या धक्कादायक घटनेनंतर महावितरणचे अधिकारी आणि ठेकेदाराच्या अभद्र संगनमताविरुद्ध संपूर्ण बीड जिल्ह्यातून संतापाचा लाव्हारस उसळला आहे. कर्जनी येथील रहिवासी असलेले अशोक खटाने हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी पावर इंजिनिअरिंग या ठेकेदार एजन्सीकडे मजुरीचे काम करत होते. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास गोरे वस्ती परिसरात त्यांना एका विजेच्या खांबावर दुरुस्तीच्या अत्यंत धोकादायक कामासाठी चढवण्यात आले होते. मात्र, जिवावर उदार होऊन काम करणाऱ्या या मजुराला ठेकेदाराकडून साधे हातमोजे, सेफ्टी बेल्ट, हेल्मेट किंवा अर्थिंग सिस्टीम यांपैकी कोणतेही जीवनावश्यक सुरक्षा किट पुरवण्यात आले नव्हते. काम सुरू असताना अचानक महावितरणच्या प्रवाहाचा तीव्र झटका बसला आणि अशोक खटाने थेट पोलवरून खाली जमिनीवर कोसळले. त्यांना रक्ताळलेल्या अवस्थेत तातडीने बीडच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र, दुर्दैवाने उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने पावर इंजिनिअरिंग या ठेकेदार एजन्सीचा अंधेर आणि भ्रष्ट कारभार पूर्णपणे चव्हाट्यावर आणला आहे. कामगारांच्या जिवाशी खेळून केवळ स्वतःचा खिसा भरण्यातच या एजन्सीला स्वारस्य असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. विशेष आणि अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, या मुजोर ठेकेदाराचा हा पहिलाच प्रताप नाही. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी २६ जून २०२६ आणि १० जुलै २०२६ (पत्र क्र. २६२८) रोजी याच एजन्सीला सुरक्षा साहित्याचा अभाव आणि करारातील अटींच्या उल्लंघनावरून दंडात्मक कारवाई व कंत्राट रद्द करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, हा केवळ कागदी घोडा नाचवण्याचा खेळ ठरला. अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळेच ठेकेदारावर कोणतीही ठोस कायदेशीर कारवाई झाली नाही. महावितरणच्या याच भ्रष्ट वरदहस्तामुळे आज एका होतकरू तरुणाचा नाहक बळी गेल्याचा घणाघात संतप्त नागरिक करत आहेत. या दुर्घटनेनंतर कर्जनीचे ग्रामस्थ आणि बीडकर कमालीचे आक्रमक झाले आहेत. दरवेळेप्रमाणे एखाद्या कनिष्ठ कर्मचाऱ्याला बळीचा बकरा बनवून मुख्य ठेकेदाराला मोकाट सोडण्याचा महावितरणचा डाव या वेळी खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड इशारा नागरिकांनी दिला आहे. ज्या पावर इंजिनिअरिंग एजन्सीने मजुरांना सुरक्षेची साधने दिली नाहीत, त्या मुख्य कंत्राटदारावर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी होत आहे. जोपर्यंत मृत खटाने यांच्या कुटुंबाला मोठी आर्थिक भरपाई आणि न्याय मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा ठाम पवित्रा आक्रमक ग्रामस्थांनी घेतला आहे. ------- ऊर्जामंत्र्यांच्या दौऱ्यादिवशीच यंत्रणेचे वाभाडे सर्वांत लज्जास्पद बाब म्हणजे, ज्या दिवशी ही दुर्दैवी आणि काळजाला घरे पाडणारी घटना घडली, त्याच दिवशी राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर या स्वतः बीड शहराच्या अधिकृत दौऱ्यावर उपस्थित होत्या. खुद्द खात्याच्या जबाबदार मंत्र्यांच्या उपस्थितीत शहरात असा भयंकर जीवघेणा प्रकार घडत असेल, तर महावितरणचे अधिकारी आणि ठेकेदार किती बेलगाम व मुजोर झाले आहेत, हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. प्रशासनाचा धाक पूर्णपणे संपल्याचे हे द्योतक आहे. ------- कोट या प्रकरणाची वरिष्ठ कार्यालयाला कल्पना दिली असून, सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. मी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वरवर पाहता यात शॉक लागल्याचे दिसून येत नाही. त्या पोलवर दोन व्यक्ती काम करत होत्या, मग एकालाच कसा शॉक लागेल? काम करताना तो वरून खाली पडल्याची शक्यता वाटते. तरीही या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. - विक्रम चव्हाण, उपकार्यकारी अभियंता, महावितरण बीड -------- कामगार कायदे आणि नुकसानभरपाई कामावर असताना मजुराचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्या कुटुंबाला कायदेशीररित्या मोठी आर्थिक भरपाई मिळण्याचा अधिकार आहे. कायद्यानुसार कंत्राटदाराने भरपाई न दिल्यास किंवा सुरक्षेत कसूर केल्यास, मुख्य मालक म्हणून महावितरणला ही भरपाई मृत कामगाराच्या कुटुंबाला द्यावी लागू शकते. महावितरण ही जबाबदारी झटकू शकत नाही. ------------ भारतीय विद्युत कायदा, २००३ आणि सुरक्षा नियम: केंद्रीय विद्युत प्राधिकरण (सुरक्षा नियम), २०१०: या नियमांनुसार विजेच्या खांबावर काम करताना अर्थिंग करणे, शटडाऊन (परमिट टू वर्क) घेणे आणि आवश्यक ती सर्व सुरक्षा साधने पुरवणे बंधनकारक आहे. विद्युत निरीक्षकाची चौकशी : कायद्याच्या कलम १६१ नुसार या अपघाताची चौकशी राज्याच्या विद्युत निरीक्षकांमार्फत केली जाते. जर त्यांनी अहवालात महावितरण आणि कंत्राटदाराला दोषी ठरवले, तर त्यांच्यावर कायदेशीर खटला चालतो आणि मोठा दंड आकारला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirur Crime : न्हावरेत कार चालकाला धमकी; मारहाण करून स्विफ्टच्या काचा फोडल्या.....

IPL 2027 : राहुल द्रविड बनणार Mumbai Indians चा नवा प्रशिक्षक, रोहित शर्मा कॅप्टन? जयवर्धनेच्या एक्सिटनंतरची Inside Story

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरण, उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

Team India : अजित आगरकरच्या जागी कोण? भारताच्या दिग्गज खेळाडूने भरला फॉर्म; तो रिंगणात उतरलाय म्हणजे बाकीचे OUT...

Baramati Crime : अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी वडिलांना जन्मठेप; पाच लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

SCROLL FOR NEXT