ॲँकर
---------
ABD26J81925
पानकनेरगाव (ता. सेनगाव) येथील पुरातन श्री क्षेत्र मानकेश्वर महादेव मंदिर.
----
‘पानमळ्यांचे गाव’ होतेय आध्यात्मिक केंद्र
--------------
पानकनेरगावचे मानकेश्वर महादेव मंदिर भाविकांचे बनतेय श्रद्धास्थान
---------
संजय सोनी
सेनगाव, ता. २२ ः तालुक्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले पानकनेरगाव येथील पुरातन श्री क्षेत्र मानकेश्वर महादेव मंदिर सध्या परिसरात भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. प्राचीन शिल्पकलेचा अजोड नमुना आणि समृद्ध इतिहास असलेली ही वास्तू परिसराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालत आहे.
यादवकालीन तथा प्रसिद्ध हेमाडपंती दगडी शिल्पशैलीची साक्ष देणारी येथील रचना इतिहासप्रेमी आणि अभ्यासकांसाठी अत्यंत कुतूहलाचा विषय ठरली आहे. जोडकामाशिवाय किंवा वैशिष्ट्यपूर्ण कोरीवकामाच्या शैलीत उभारलेले मंदिराचे हे देखणे बांधकाम आणि परिसरातील शांत आणि प्रसन्न वातावरण मनाला वेगळीच ऊर्जा देते. जुन्या ऐतिहासिक ग्रंथांच्या आणि अवशेषांच्या संदर्भावरून या परिसराला प्राचीन काळापासून मोठे धार्मिक महत्त्व लाभल्याचे स्पष्ट होते.
पानकनेरगाव हे केवळ धार्मिकच नव्हे, तर ऐतिहासिक नावासाठीही ओळखले जाते. भूतकाळात या भागात शेकडो प्रमाणावर असणाऱ्या पानाच्या मळ्यांमुळे या गावाला ‘पानकनेरगाव’ हे नाव मिळाले. या समृद्ध वारशात मानकेश्वर महादेव मंदिराची भर पडल्याने गावाची ओळख आता एका प्रमुख धार्मिक स्थळ म्हणूनही होऊ लागली आहे.
-------
भाविकांची वर्दळ आणि उत्सव
या मंदिरात सर्वसामान्य दिवसांतही भाविकांची दर्शनासाठी नेहमीच वर्दळ असते. त्यासोबतच श्रावण मास, महाशिवरात्री तसेच विविध सण-उत्सवांच्या निमित्ताने या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. कालौघात अनेक ऐतिहासिक वास्तू काळाच्या पडद्याआड जात असल्या, तरी पानकनेरगावचे मानकेश्वर महादेव मंदिर आपल्या प्राचीन संस्कृतीचा आणि भक्तीचा दीप तेवत ठेवून आजही दिमाखात उभे आहे. या ऐतिहासिक हेमाडपंती मंदिराच्या संवर्धनासाठी आणि परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा, अशी आग्रही मागणी आता स्थानिक नागरिक व भाविकांमधून होत आहे.
-----------------
((कोट))
पानकनेरगाव येथील मानकेश्वर हे अत्यंत पुरातन आणि जागृत देवस्थान आहे. या भागाचा आणि मंदिराचा सर्वांगीण विकास व्हावा, हीच सर्व भाविक व नागरिकांची मुख्य अपेक्षा आहे.
-मल्लिकार्जुन महाराज, पुजारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.