Maratha Reservation Sakal
छत्रपती संभाजीनगर

Maratha Reservation : सरकारने भूमिका बदलू नये; आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही - मनोज जरांगे

Manoj Jarange : ‘ग्रामीण भागातील मराठा, ओबीसी बांधवांनी शांततेत राहावे. एकमेकांना सहकार्य करावे. वादविवाद होऊ देऊ नका’ असे आवाहन त्यांनी उपोषणस्थळी समाजबांधवांना मार्गदर्शन करताना केले.

सकाळ वृत्तसेवा

वडीगोद्री (जि. जालना) - मराठा आरक्षणाशी संबंधित मागण्यांवर निर्णयासाठी राज्य सरकारने १३ जुलैपर्यंत वेळ मागून घेतला आहे. सातारा, मुंबई, हैदराबादचे गॅझेट स्वीकारणे, आमच्या व्याख्येप्रमाणे सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आदी मागण्यांवर ठाम आहे.

सरकारने आता भूमिका बदलू नये. आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात उपचारानंतर १२ दिवसांनी जरांगे आज अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे उपोषणस्थळी दाखल झाले. मोठे शक्तिप्रदर्शन करत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

‘ग्रामीण भागातील मराठा, ओबीसी बांधवांनी शांततेत राहावे. एकमेकांना सहकार्य करावे. वादविवाद होऊ देऊ नका’ असे आवाहन त्यांनी उपोषणस्थळी समाजबांधवांना मार्गदर्शन करताना केले.

‘‘मंत्री छगन भुजबळ यांनी शेरोशायरीमध्ये जे सांगितले त्याची शासनाने दखल घ्यावी. लोकांना भडकाविण्याचे त्यांचे स्वप्न नागरिक पूर्ण होऊ देणार नाहीत. आम्ही कुणाच्या ताटातील घेत नाही. शासनाने १३ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. तो पर्यंत वाट पाहणार आहे. यात भूमिका बदलली तर शासन बदलेल. हे आंदोलन जनता हाताळत आहे. केलेल्या चुका सोडून द्या,’’ असे जरांगे म्हणाले.

तोंडाला काळे फासणे ही झुंडशाही; हाके

जालना : ‘‘लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवेदन देऊन मागणी करण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यांना कोणी विरोध करू नये म्हणून एखाद्या निवेदनकर्त्याला काळे फासणे म्हणजे झुंडशाही असून, कायद्याचा आवाज दाबण्याचे काम राज्यात होत आहे,‘‘ असे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैकांदिवली – चारकोपमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने लोक संतप्त

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT