Manoj Jarange Patil and Chhagan Bhujbal Esakal
छत्रपती संभाजीनगर

Manoj Jarange Patil : फडणवीस, अजित पवारांना ‘तो’ संपवू शकतो; छगन भुजबळ यांच्यावर टीका

‘जरांगे किस झाड की पत्ती है,’ असे वक्तव्य भुजबळ यांनी केले होते.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - ‘तुम्ही मोठ्या लोकांना अंगावर घेतले असेलही; पण, माझ्या नादी लागू नका. मराठा आरक्षणावरही बोलू नका. धनगर आरक्षणाविषयी काहीच बोलत नाही. हा माणूस देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनाही संपवू शकतो. याच्यापासून सावध राहा,’ अशी टीका मनोज जरांगे-पाटील यांनी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव न घेता केली.

जरांगे शनिवारी येथे आले होते. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘जरांगे किस झाड की पत्ती है,’ असे वक्तव्य भुजबळ यांनी केले होते. त्यावर जरांगे म्हणाले, ‘हा माणूस खूप घातकी आहे. गरीब ओबीसी, धनगर समाजाचा वापर त्यांनी स्वतःवरील गुन्हे मागे घेण्यासाठी केला. उद्या तो फडणवीस आणि अजित पवार यांनाही संपवू शकतो. त्यांनी माझ्या नादी लागू नये. मराठ्यांच्या आरक्षणाविषयी बोलूच नये. ते धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी काहीच बोलत नाहीत. मराठा समाजाविरोधात धनगर समाजाला उभे करीत आहे. याला बळी पडू नका.’

सरसकट गुन्हे मागे घ्या

‘सरकारने आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घेणार असल्याचे सांगितले होते; पण, निष्पाप मराठा समाजावर अन्याय केला. सरसकट गुन्हे मागे घ्या हे सरकारमधील मंत्र्यांनीच (फडणवीस) सांगितले होते. त्यामुळे हे गुन्हे त्यांना मागे घ्यावेच लागतील. कोणत्याही जाळपोळीचे आम्ही समर्थन करीत नाही. हे तेव्हाही सांगितले होते, आताही तेच सांगत आहोत. मराठा समाजातील मुलांना जाणीवपूर्वक उचलून तुरुंगात टाकले जात आहे. हे समाज पाहत आहे. समाजात सरकारविषयी नाराजी आहे,’ असेही जरांगे म्हणाले.

मी संताजी-धनाजी यांच्यासारखा

‘अनेकजण तुमच्यावर टीका करीत आहेत,’ या प्रश्नावर जरांगे म्हणाले, ‘मी विरोधकांना धनाजी-संताजीसारखा पाण्यात दिसू लागल्यामुळे ते माझ्यावर टीका करीत आहेत. त्यांनी कितीही विरोध केला, तरी ओबीसीतून आरक्षण घेणारच.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT