फोटो
OSM26B07251
OAM26B07252
------------------
झेंडूच्या फुलांची विक्री जोरात
धाराशिव, ता. २० (बातमीदार) : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर शहराच्या बाजारपेठेत मंगळवारी (ता.२०) झेंडूच्या फुलांची मोठी आवक झाल्याने दरही ग्राहकांच्या आवाक्यात होते. त्यामुळे ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात या फुलांची खरेदी केली.
दसरा सणाच्या पूर्वसंध्येला, म्हणजेच सोमवारी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर फुलांची खरेदी केली होती. त्यामुळे मंगळवारी सणाच्या दिवशी सकाळी परिसरातील शेतकरी व व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फुले विक्रीसाठी आणली होती. त्यामुळे आवक वाढल्याने फुलांचे दरही सोमवारच्या तुलनेत मंगळवारी निम्म्यावर आले होते. आवक अधिक आणि मागणी कमी असल्यामुळे विक्रेत्यांना दर कमी करून फुलांची विक्री करावी लागली.
दसरा सणादिवशी नागरिक एकमेकांना आपट्याची व समदाडाची पाने देऊन सणाच्या शुभेच्छा देतात. समदड आणि आपट्याच्या झाडांची संख्या तुरळक आहे. काहींनी आपटा व समदडाची पाने उपलब्ध करून त्याची बाजारपेठेत विक्री सुरू केली होती. त्याच्या जुड्या करून १० रुपयांना एक जुडी याप्रमाणे आपटा आणि समदडाच्या पानाची विक्री करण्यात आली. दसरा सणाला आपट्याच्या पानाला सोने आणि समदडाच्या पानाला चांदी, असे म्हटले जाते.
-----------------
((कोट))
यंदा पावसाअभावी फुलशेतीचे आधीच मोठे नुकसान झाले आहे. त्यातच सणाच्या दिवशी बाजारात फुलांची आवक वाढली. मात्र, ग्राहकांची संख्या कमी असल्याने दर अर्ध्यावर आले.
- सचिन धंगेकर, फुलशेती उत्पादक
....................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.