marriage e sakal
छत्रपती संभाजीनगर

Marriage Fraud : सावधान! टोळी आलीय...; ‘ती’ 20 दिवस नांदली अन् रोकड, दुचाकी घेऊन साथीदारासह फरार झाली

लग्नाच्या नावाखाली फसवणुका करणाऱ्या अनेक टोळ्या सक्रीय झाल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Khulatabad : ग्रामीण भागात युवकांच्या लग्नाचा प्रश्न जटिल बनला असून याचाच फायदा लग्न जमवून देणारे दलाल घेत असून तालुक्यातील पळसवाडी येथील एका तरुणाची २० दिवसआधी लग्न झालेली एक नव विवाहिता दुचाकीवर साथीदारासह पसार झाल्याची घटना शुक्रवारी (ता.१८) शुक्रवारी घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील पळसवाडी येथील एका तरुणाचा दलालामार्फत नागपूर येथील मुलीशी विवाह ठरला. मुलगी सुंदर असल्याने वराकडील मंडळीने होकार दिला. त्यानुसार मुलीकडून चार महिला, एक मामा असे वऱ्हाड मंडळी आले. लग्न वेरूळ येथील एका मठात ३१ जुलैला पार पडले.

लग्नविधी प्रसंगी मुलीला दाग, दागिने घालण्यात आले. लग्नानंतर फिरण्यासाठी नववधूसाठी मुलाने दोन लाखाची दुचाकी आणली. सदरील विवाहिता २० दिवस पळसवाडीत राहिली. त्यानंतर शुक्रवारी (ता.१८) रात्री नववधुने घरातून ३० हजार रुपये, नवी कोरी दुचाकी स्वतः चालवीत गावातून पलायन केले. काही अंतरानंतर साथीदारास सोबत घेत नागपूरकडे समृद्धी महामार्गाने धूम ठोकली.

याबाबत गावातील सी.सी.टी.व्ही.फुटेजसह, समृद्धी महामार्गावरील दोन पथकर नाक्यांवरील कॅमेऱ्यामध्ये सदरील नववधू दुचाकीवर पळून जात असल्याचे दिसून आले. याप्रकरणी अद्याप खुलताबाद पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज आलेला नसल्याचे बीट जमादार आव्हाड यांनी सांगितले.

पळसवाडीत दलालांमार्फत आठ लग्न

तालुक्यातील पळसवाडी येथे दलालांमार्फत यापूर्वी आठ लग्न झालेले असून यातील दोन प्रकरणात वराकडील मंडळीला झटका बसला आहे. तर नववधू पळून गेल्याने तालुक्यातील मावसाळा येथेही असाच प्रकार काही महिन्यापूर्वी घडला होता. ग्रामीण भागातील तरुणांच्या लग्नाचा प्रश्न गंभीर बनला असून याचाच फायदा लग्न जमविण्याचे आमिष दाखवून दलाल घेत असल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar: 'आता तुझा नंबर', प्रदीप पूर्णेकरांनंतर कुटुंबातील आणखी एका सदस्याला जीवे मारण्याची धमकी, ठाण्यात खळबळ

Water Conservation: पाणीसाठा पुरविण्याचे आव्हान;जिल्ह्यात ३८ संस्थांना कपातीचे निर्देश

Mumbai Firing: वडाळ्यात रात्री गोळीबाराचा थरार! कारमधून उतरले अन् तरूणावर गोळ्या झाडल्या; तिघांना अटक, Video Viral

Gokul Milk Union Election : गोकुळ दूध संघ निवडणूक : सतेज पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क; कोणत्या केंद्रावर किती मतदान? करवीरमध्ये काय होणार?

Latest Marathi News Live Update : सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा फाटा येथे ३ वाहनांचा भीषण अपघात, ट्रॅक्टर चालक ठार

SCROLL FOR NEXT