छत्रपती संभाजीनगर

मातृत्व रजा किती आणि कुणाला मिळते ?

CD
(‘ती’चा कायदा) ---- मातृत्व रजा किती आणि कुणाला? ---- भारतीय महिलांना आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर कायद्यांचे संरक्षण मिळते. आज अशाच एका टप्प्यासंबंधीचे कायदे काय आहेत, हे आपण पाहणार आहोत. आज आपण अशा कायद्यांचा विचार करणार आहोत, जो केवळ महिलांसाठीच नाही, तर प्रत्येक कुटुंबासाठी, समाजासाठी आणि देशासाठी महत्त्वाचा आहे. तो कायदा आहे मातृत्व लाभ कायदा. काम करणाऱ्या महिलांना, मातृत्वाच्या काळात कायदेशीर संरक्षण देण्याचा उद्देश या कायद्यामागे आहे. ‘आई होणे’ हा महिलांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण आहे. पण, त्यासाठी आरोग्याच्या बऱ्याच बदलांना महिलांना सामोरे जावे लागते आणि बऱ्याच गोष्टींचा त्यागही करावा लागतो. त्यागाची किंमत तिला नोकरी सोडून मोजावी लागू नये, यासाठी कायदेशीर संरक्षण गरजेचे आहे. हा कायदा प्रामुख्याने संबंधित आस्थापना, कारखाने, दुकाने आणि इतर पात्र आस्थापनांतील महिला कर्मचाऱ्यांना लागू होतो. पात्र महिला कर्मचाऱ्यांना प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरच्या कालावधीसाठी वेतनासह मातृत्व लाभ/रजा मिळते. ही रजा मिळण्याचे वेगवेगळे टप्पे आहेत. पहिल्या दोन अपत्यांसाठी जास्तीत-जास्त २६ आठवडे, म्हणजे सहा महिने आणि दोन आठवडे मातृत्व रजा मिळू शकते. परंतु, दोन अपत्यांपेक्षा जास्त अपत्य हयात असल्यास, जास्तीत-जास्त १२ आठवडे रजा मिळते. या २६ आठवड्यांपैकी, जास्तीत-जास्त आठ आठवडे, म्हणजे दोन महिने रजा प्रसूतीपूर्व घेता येते. पण, बहुतांश महिला या प्रसूतीनंतरच जास्तीत-जास्त रजा घेतात. ---- ‘कमिशनिंग मदर’साठी तरतूद सरोगसीद्वारे आई होऊ इच्छिणाऱ्या महिलांना कमिशनिंग मदत म्हटले जाते. अशा महिलेसाठीही रजेची तरतूद आहे. या महिलेला बारा आठवड्यांची मातृत्व रजा मिळते. --- गर्भपात झाल्यासही रजा भारतातले कायदे हे कल्याणकारी कायदे आहेत. म्हणजे, फक्त प्रसूतीसाठीच रजा मिळते असे नाही, तर काही कारणांमुळे दुर्दैवाने गर्भपात झाल्यास सहा आठवड्यांची हक्काची रजा महिलांना मिळते. ---- गर्भधारणेशी संबंधित आजार गर्भधारणेशी संबंधित आजार झाल्यास, जास्तीत-जास्त एक महिना अतिरिक्त रजा मिळते. पण, त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असते. पण, ही रजा आस्थापनेवर काम करणाऱ्या प्रत्येक महिलेला मिळते असे नाही. तर, अपेक्षित प्रसूतीच्या तारखेपूर्वीच्या बारा महिन्यात संबंधित आस्थापनेत किमान ८० दिवस काम केलेले असणे, ही मातृत्व लाभ मिळण्यासाठी महत्त्वाची अट आहे. - ॲड. गीता देशपांडे deshpandegeeta3@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : ५०० कोटींच्या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत विषय संपवणार नाही; मनोज जरांगेंचा फडणवीस, शिंदेंना तपासाचे आव्हान

IND vs NZ 2nd T20: ६ चेंडूंत ११ धावा, शेवटच्या चेंडूपर्यंत थरार! तिलक-नितीशने पलटवला सामना, भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय!

Piyush Goyal : पावभाजीची चव रोबोट देऊ शकणार नाही; वैभव सूर्यवंशीसारखा सिक्सरही नाही! कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मर्यादा आणि भारतातील संशोधनाच्या संधींवर पियुष गोयल यांची मांडणी

Latest Marathi News Live Update : तर आम्ही आणखी मोठा बॉम्ब फोडणार! मनोज जरांगे पाटील आक्रमक

आधी सौंदर्यस्पर्धांवर बंदी, आता मृत्युदंडाची शिक्षा! बुर्किना फासोच्या निर्णयांची का आहे जगभरात चर्चा?

SCROLL FOR NEXT