छत्रपती संभाजीनगर

सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत अकरावी प्रवेशाची अर्जप्रक्रिया सुरू

CD
सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू ------ छत्रपती संभाजीनगर, ता. २५ : महाराष्ट्र शासनाच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेने शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी अकरावीच्या प्रवेशाची अधिसूचना प्रसिद्ध केली. छत्रपती संभाजीनगर येथील मुलांच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेच्या ५१ व्या तुकडीसह नाशिक येथील मुलींच्या संस्थेच्या पाचव्या तुकडीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रवेशासाठी उमेदवार अविवाहित असणे आवश्यक आहे. उमेदवार महाराष्ट्राचा अधिवासी असावा. तसेच कर्नाटकातील केवळ बिदर, बेळगाव आणि कारवार जिल्ह्यांतील अधिवासी उमेदवारांनाही अर्ज करता येईल. उमेदवाराची जन्मतारीख १ जुलै २०१० ते १ जुलै २०१३ या कालावधीत असावी. २०२७ मध्ये दहावीची परीक्षा देणारे विद्यार्थी तसेच जून २०२७ मध्ये अकरावीत प्रवेश घेण्यास पात्र असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी संबंधित संकेतस्थळांना भेट देण्याचे आवाहन केले आहे. ---- चार एप्रिलला प्रवेश परीक्षा पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा चार एप्रिल २०२७ रोजी इंग्रजी माध्यमातून विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल. परीक्षेत गणिताचे ७५ आणि सामान्य क्षमता चाचणीचे (जीएटी) ७५ असे एकूण १५० बहुपर्यायी प्रश्न असतील. प्रत्येक योग्य उत्तरासाठी चार गुण, तर चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जातील. लेखी परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना मुलाखत, वैद्यकीय तपासणीसाठी बोलावले जाईल. ---- ऑनलाइन अर्ज अनिवार्य मुलांसाठी www.spicsn.com तर मुलींसाठी www.girlspinashik.spicsn.com या संकेतस्थळांवर अर्ज उपलब्ध आहेत. परीक्षा शुल्क ४५० रुपये असून ते ऑनलाइन भरावे लागेल. अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत २० फेब्रुवारी २०२७ आहे. प्रवेश परीक्षेचे हॉलतिकीट २० मार्च २०२७ नंतर संकेतस्थळावरून डाउनलोड करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: हरमनप्रीत-दीप्तीने रचला शतकांचा डाव! भारताने झिम्बाब्वेसमोर ठेवलं मोठं लक्ष्य, दुसऱ्या डावात थरार सुरू

Mohol Crime New: मोहोळमध्ये ८५ वर्षीय वृद्धेला गंडा; दूध देण्याचे आमिष दाखवून ५० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

Dilip Walse Patil: कर्जतमधील वृक्षतोडीचा भीमाशंकर अभयारण्याशी संबंध नाही; दिलीप वळसे पाटलांचे स्पष्टीकरण

Solapur Crime: मेहुणीला शिक्षणासाठी घरी आणलं, पत्नी असताना तिच्यासोबत लग्न केलं अन्...; सासऱ्याने घडवला रक्तरंजित थरार

VIDEO : मल्लिकार्जुन खरगेंचं वादग्रस्त वक्तव्य; PM मोदींबद्दल बोलताच कार्यक्रमात गोंधळ, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून एकाला मारहाण, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT