Name change is not valid of aurangabad decision will taken again Devendra Fadnavis sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादचं नामांतर अवैध, पुन्हा निर्णय होणार - देवेंद्र फडणवीस

औरंगाबादच्या नामांतराचा घाईत घेतलेला निर्णय चुकल्याचे सांगत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर आणखी एक उलटवार केला.

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : औरंगाबादच्या नामांतराचा घाईत घेतलेला निर्णय चुकल्याचे सांगत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर आणखी एक उलटवार केला. बहुमत चाचणीची सूचना असताना नामांतराचे ठराव मंजूर करण्यात आले, त्यामुळे नव्याने हे ठराव घेण्याचे सूतोवाच त्यांनी केले. त्यामुळे औरंगाबादच्या नामांतराचा ठराव शिंदे मंत्रिमंडळात पुन्हा मंजूर करावा लागणार आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घाईघाईने मंत्रिमंडळाची बैठक बोलावली.

त्यात औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करून घेण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी करून दाखवले, असे म्हणत शिवसेनेने भाजपला डिवचले. शिवाय केंद्राकडे चेंडू टोलवत नामांतराला मोदी सरकारने मंजुरी दिली नाही, तर खापर भाजपच्या माथी फोडता येईल, अशी खेळी केली.

कृती समिती न्यायालयात जाणार

औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामांतर करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारा आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भूमिका औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतराविरोधी कृती समितीचे अध्यक्ष मुश्ताक अहमद यांनी घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT