छत्रपती संभाजीनगर

डॉ. गुंजन शीरभाते यांच्या व्हायोलिन वादनाने मैफलीत रंग

CD
(ABD26J81803) छत्रपती संभाजीनगर ः शारदीय संगीत नवरात्र महोत्सवात गायन करताना पंडिता शुभदा पराडकर यांच्यासह इतर. --- डॉ. गुंजन शीरभाते यांच्या व्हायोलिन वादनाने मैफलीत रंग छत्रपती संभाजीनगर, ता. २० ः शारदीय संगीत नवरात्र महोत्सवाची सांगता व्हायोलिनच्या सुरेल नादाने आणि शास्त्रीय गायनाच्या मैफलीने झाली. डॉ. गुंजन शीरभाते यांच्या व्हायोलिन वादनाने आणि पंडिता शुभदा पराडकर यांच्या सुरेल गायनाने मैफलीत रंग भरले. स्वर, लय आणि रागदारीच्या संगमातून साकारलेल्या या मैफलीने रसिकांना अविस्मरणीय सांगीतिक अनुभूती दिली. भाग्यनगर परिसरात सोमवारी (ता. १९) नेत्रतज्ज्ञ डॉ. अनिता देशपांडे आणि डॉ. श्रीरंग देशपांडे यांच्या निवासस्थानी हा महोत्सव पार पडला. पहिल्या सत्रात नांदेड येथील व्हायोलिनवादक डॉ. गुंजन शीरभाते यांनी वादनास सुरवात राग यमनने केली. व्हायोलिनमधून उमटणारे स्वर, रागाची मांडणी आणि सुरांवरील पकड यांमुळे मैफलीत रंगत आली. त्यानंतर त्यांनी रेणुकामातेवरील ‘माझी रेणुका माउली’ हे गीत व्हायोलिनवर सादर करून भक्तिभावाची अनुभूती दिली. त्यांना तबल्यावर रुद्र गजानन केचे यांनी साथ केली. दुसऱ्या सत्रात गायिका पंडिता शुभदा पराडकर यांच्या गायनाने समारोपाच्या मैफलीला उंची प्राप्त झाली. संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत गायकांच्या गुरू म्हणून परिचित असलेल्या शुभदा यांनी प्रदीर्घ सांगीतिक अनुभवातून समृद्ध झालेल्या गायकीचे दर्शन घडवले. त्यांनी राग नट बिहाग, परज आणि दादरा सादर करत रागदारी संगीताच्या विविध छटा उलगडल्या. हार्मोनियमवर प्रा. दिलीप दोडके, तबल्यावर दत्ता गोगटे, तानपुऱ्यावर चंदन आडगावकर आणि युगंधरा केचे यांनी साथसंगत केली. सूत्रसंचालन प्रवीण शर्मा यांनी केले. महोत्सवासाठी अनिल देशपांडे, कृष्णा देशपांडे, किरण लोंढे, सुरेश काळे, नाजीम सय्यद, कुणाल कदम, संदीप बनकर, ख्वाजा नजीमुद्दिन, कैलास वाघमारे, विजय गायकवाड, शशिकला शेजवळ, स्वाती बागेलीकर, वंदना नितनवरे, सागर वाघमारे यांनी पुढाकार घेतला. ---

Dasara Melava 2026: संजय राऊतांचा अमित शाहांवर हल्लाबोल; 'लॉरेन्स बिश्नोई अस्तित्वात नाही, अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई'

Eknath Shinde : "शेतकऱ्यांच्या लेकींच्या लग्नाचा सर्व खर्च आमचा"; दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी घोषणा!

INDW vs ZIMW 3rd T20I: १० चौकार, ५ षटकार अन् ९१ धावा! हरमनप्रीत कौर रडली, चेहरा लपवताना दिसली; म्हणाली, त्या शब्दांनी...

Latest Marathi News Live Update : जाणून घ्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Dasara Melava : दसरा मेळाव्यात राजकीय रणसंग्राम; मनोज जरांगे आणि रामदास कदम यांच्यातील वाद विकोपास!

SCROLL FOR NEXT