छत्रपती संभाजीनगर

पदवीधर निवडणुकीकडे पधवीधरांनी फिरवली पाठ

CD
निडेबन मतदान केंद्रावर सर्वाधिक मतदान ---- पदवीधर निवडणूक ः उदगीरला मतदानाचा टक्का ५८ टक्क्यांवर -- उदगीर, ता. २४ (बातमीदार) : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उदगीर विधानसभा क्षेत्रात ५८.३३ टक्के मतदानाची नोंद झाली. शहरासह परिसरातील १३ मतदान केंद्रांवर एकूण ६ हजार ९६ मतदारांपैकी ३ हजार ५५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे एकूण मतदारांपैकी ४१.६७ टक्के मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. निडेबन येथील तलाठी कार्यालयाच्या केंद्रावर सर्वाधिक ६३.१८ टक्के मतदान झाले. या केंद्रावर ४४० मतदारांपैकी २७८ मतदारांनी मतदान केले. दुसरीकडे, शिवाजी महाविद्यालयाच्या पूर्व बाजूच्या मतदान केंद्रावर सर्वांत कमी ४८.३७ टक्के मतदानाची नोंद झाली. शहरातील गटसाधन केंद्रावर ४४३ मतदारांपैकी २६३ मतदारांनी मतदान केले. या केंद्राची मतदानाची टक्केवारी ५९.३७ इतकी झाली. निडेबन केंद्रावर ४४० पैकी २७८ मतदारांनी मतदान केले, तर तलाठी कार्यालयाच्या केंद्राने सर्वाधिक मतदानाची टक्केवारी नोंदवली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुख्य इमारत येथे ७०० मतदारांपैकी ४१८ मतदारांनी मतदान केले. या केंद्राची मतदानाची टक्केवारी ५९.७१ होती. लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या पूर्व बाजूच्या केंद्रावर ७०० पैकी ३९२ मतदारांनी मतदान केले. येथे ५६ टक्के मतदानाची नोंद झाली. शिवाजी महाविद्यालयाच्या पूर्व बाजूच्या केंद्रावर ६९८ मतदारांपैकी ३३६ मतदारांनी मतदान केले. या केंद्रावर ४८.३७ टक्के मतदान झाले. महाविद्यालयाच्या पश्चिम बाजूच्या केंद्रावर ६४९ मतदारांपैकी ४०२ मतदारांनी मतदान केले. येथे ६१.९० टक्के मतदान झाले. तालुक्यातील ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवरही मतदारांनी सहभाग नोंदवला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मोघा) येथे ३३६ मतदारांपैकी २०० मतदारांनी मतदान केले. तोडार येथील केंद्रावर ३३६ मतदारांपैकी १९६ मतदारांनी मतदान केले. या केंद्रावर ५८.०४ टक्के मतदान झाले. देवर्जन येथील जिल्हा परिषद शाळेत २८७ मतदारांपैकी १६३ मतदारांनी मतदान केले. येथे ५६.७९ टक्के मतदानाची नोंद झाली. वाढवणा (बु) येथील केंद्रावर ४३२ मतदारांपैकी २६८ मतदारांनी मतदान केले. या केंद्राची मतदानाची टक्केवारी ६२.०४ होती. नळगीर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत ४३७ मतदारांपैकी २६७ मतदारांनी मतदान केले. या केंद्रावर ६१.१० टक्के मतदान झाले. तसेच नळगीर येथील अन्य केंद्रावर ३२१ मतदारांपैकी १९० मतदारांनी मतदान केले. येथे ५९.१९ टक्के मतदानाची नोंद झाली. --- निडेबन ः ६३.१८ टक्के मतदान उदगीर विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रनिहाय आकडेवारीत निडेबन येथील तलाठी कार्यालयाच्या केंद्राने ६३.१८ टक्के मतदानासह आघाडी घेतली. वाढवणा आणि महाविद्यालयाच्या पश्चिम बाजूच्या केंद्रावरही तुलनेने चांगले मतदान झाले. मात्र, काही केंद्रांवर मतदानाची टक्केवारी ५० टक्क्यांच्या आसपास राहिली.

Share Market: ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंला SEBIचा दणका! 546 कोटी परत करण्याचे आदेश, 67 कोटी व्याज अन् 11.5 कोटींचा दंडही भरावा लागणार

IND vs NZ 2nd T20I Live: श्रेयस अय्यरचा त्रिफळा, अक्षर पटेलचा अफलातून झेल! मिचेल सँटनरने ११ चेंडूंत ३ विकेट्स घेतल्या, Video

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवा खुलासा! सुरतमध्ये लपवलेले शस्त्र जप्त, 4 नवीन संशयितांना अटक

दिवाळीनंतर चमकणार 'या' ३ राशींचे नशीब! बुधाची सरळ चाल ठरणार गेमचेंजर; हातात खेळणार अपार पैसा...

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी उद्या वाराणसी दौऱ्यावर; कसा असेल कार्यक्रम?

SCROLL FOR NEXT