छत्रपती संभाजीनगर

ओजीटी उपक्रम विद्यार्थ्यांना व्यावसायिकदृष्ट्या सक्षम बनवणारा

CD
लातूर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत प्राध्यापकांचा सत्कार करताना महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे आणि सचिव माधवराव पाटील-टाकळीकर. - प्राध्यापकांनी जाणून घेतली ‘ओजीटी’ संकल्पना ---- महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात ‘ओजीटी’बाबत एकदिवसीय कार्यशाळा लातूर, ता. १६ : कला, वाणिज्य, विज्ञान व तत्सम शाखेतील विद्यार्थ्यांना व्यवसाय किंवा नोकरी मिळविण्याआधी त्यांना त्या विषयाचे सखोल शास्त्रीय ज्ञान आणि कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा या दृष्टिकोनातून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ द्वारा ‘ऑन जॉब ट्रेनिंग’ (ओजीटी) ही संकल्पना अभ्यासक्रमामध्ये मांडण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यात विविध महाविद्यालयातील ओजीटी समन्वयक, सहसमन्वय आणि प्राध्यापक सहभागी झाले होते. यावेळी श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे, संस्थेचे सचिव माधवराव पाटील-टाकळीकर, कोषाध्यक्ष विजयकुमार रेवडकर, कार्यकारी संचालक प्रदीप दिंडेगावे, संचालक राजेश्वर पाटील, प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे, प्राचार्य दुष्यंत कटारे, प्राचार्य सुजाता चव्हाण, प्राचार्य एस. एम. प्रयास, प्राचार्य पी. बी. गोर उपस्थित होते. कार्यशाळेत सांगवे म्हणाले, की विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षणासोबत दैनंदिन व्यवहाराचे शिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे. जपानमध्ये आठव्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञान दिले जाते. त्याच दृष्टिकोनातून आपणही प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राष्ट्राबद्दलचा स्वाभिमान जागृत होईल, शिवाय आपले राष्ट्र विकसित होण्यास मदत होईल. कार्यशाळेत शिवप्रसाद डोंगरे यांनी सूत्रसंचालन केले. डी. आर. भुरे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 5th T20: भारत-वेस्ट इंडिजचा अंतिम टी-२० सामना कुठे अन् कधी पाहता येणार? LIVE Streaming, वेळ अन् TV चॅनेलची माहिती जाणून घ्या

Marathwada Graduates Constituency Election : मराठवाडा पदवीधर निवडणुकीत रंगत! नेत्यांचे फोटो दोन्ही उमेदवारांच्या प्रचार बॅनरवर; मतदार संभ्रमात!

Parli Vaijnath News : आमदार धनंजय मुंडे यांनी परळीत देवीचे दर्शन घेतले, आपल्या हाताने खिचडी प्रसाद बनवला आणि भाविकांना वाटला ही....

Marathi News Live Updates: गोरेगावात काळीज पिळवटून टाकणारी घटना; १० वर्षांच्या मुलीने १८ महिन्यांच्या चिमुरडीला ६ व्या मजल्यावरून फेकले

Death Penalty: मेरठ कोर्टाचा ऐतिहासिक निकाल! पतीला साप चावल्याचा बनाव करणाऱ्या पत्नीसह प्रियकराला फाशीची शिक्षा

SCROLL FOR NEXT